बीड शहर

’ बेटी हूं आपकी, कोई झंडा नही !’ 

जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. तेथिल पर्वतरांगा निसर्ग सौन्दर्यांची साद घालतात. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणारा जवान शत्रूंना मुंह तोड जवाब देत आहे. अशा वैविध्यपूर्णतेने नटलेल्या काश्मिरात एक कोवळी कळी कुस्करून टाकली जाते आणि व्यवस्थेतील काही लोक तिच्यावर अत्याचार करणार्‍यांच्या बाजूने  भूमिका घेतात , केवढा हा विरोधाभास. ज्या काश्मिरातील निसर्ग सौंदर्याचे गोडवे जगात गायले जातात,  जिथल्या मातीत शौर्याचं रक्त सांडल जातंय आज तिथेच माणुसकीचा निर्घृण हत्या झालीय.

केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्ते पणाच्या विरोधात मोर्चा मध्ये सहभागी व्हा-फारोख पटेल

केंद्र व राज्य सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालते परंतु देशातील जनता जम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणा बाबत बीजेपी सरकार वर चोही बाजूनी हल्ले करत आहे .

पत्रकारांच्यावतीने प्रशासनाला निवेदन

बीड, (प्रतिनिधी):- बातमी छापली म्हणून गुन्हा दाखल करुन लेखणीची मुस्कटदाबी करणार्‍या पोलिस प्रशासनाच्या निषेध नोंदवून पत्रकारांनी आज अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. सदरील गुन्हा मागे घ्यावे अशी एकमुखी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली.

बीडमध्ये मंगळवारी मुकमोर्चा सर्व धर्मिय नोंदवणार निषेध

बीड, (प्रतिनिधी):- जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय आसिफावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली तर उन्नावमध्येही एका दलित महिलेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवत मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी बीडमध्ये मुकमोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय मुस्लिम समाजाच्यावतीने आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या मुकमोर्चामध्ये सर्व धर्मीय नागरिक सहभागी होणार आहेत.

आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून  1 कोटी 30 लक्ष रूपयांच्या कामांना मंजूरी

बीड दि.13 (प्रतिनिधी)ः- मतदरसंघातील सामाजिक समतोल लक्षात घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी 13 गावातील कामांना मंजूरी करून घेतली आहे. यापैकी 7 गावात सामाजिक सभागृह, पाणी पुरवठा आणि रस्ते सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 30 लक्ष रूपये शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे.  मंजूर झालेल्या कामांमुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्काऊट गाईडचे नव निर्वाचित राज्य आयुक्त संतोष मानूरकर यांचा यथोचित सत्कार

बीड(प्रतिनिधी)-संतोष मानूरकर यांनी आपल्या पत्रकारीतेचा विधायक वापर हा स्काऊट गाईड चळवळीच्या उभारणीसाठी लावला. हा आदर्श स्काऊट गाईड चळवळीला राज्यासाठी उभा राहिला. त्यामुळेच स्काऊट गाईडचे मुख्य राज्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी हा बीड पॅटर्न राज्यात संतोषरावांनी राबवावा आणि स्काऊट गाईडला लोकचळवळीचे स्वरुप द्यावे या व्यापक दृष्टीकोणातून त्यांची राज्य आयुक्त पदी निवड केली आहे. हेच बीडच्या पत्रकारीतेचे खरे यश म्हणावे लागेल. संतोषरावांनी पत्रकारीता करताना शत्रू नव्हे तर मित्र गोळा केले म्हणुनच ते पत्रकारीतेतील अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.

पोलिसांकडून लेखणीची मुस्कटदाबी बातमी छापली म्हणून गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांविरुद्ध संताप

बीड, (प्रतिनिधी):- वृत्तपत्रामध्ये बातमी छापली म्हणून संबंधित वार्ताहर आणि संपादक यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरील तक्रार वाहतुक शाखेच्या पोलिसांनी दिली असुन पोलिसांकडूनच लेखणीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे यावरुन स्पष्ट होते. या प्रकरणांवरुन पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त होवू लागला असुन यापुढे पोलिसांना विचारुन आणि दाखवून बातम्या छापायच्या का?

मोटार सायकल अपघातात एक ठार

बीड, (प्रतिनिधी):- मोटार सायकल अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होवून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री घडली. सदरील मोटारसायकलला नांदूरघाटजवळ अपघात झाला होता.

रेल्वे सबस्टेशनचे खरे श्रेय कृती समितीलाच राहणार-खुर्शीद आलम

बीड, (प्रतिनिधी):- बीडच्या रेल्वे प्रश्‍नाचे श्रेय पालकमंत्री आणि खासदार घेत असले तरी नागरिक आंदोलनाच्या रेट्यामुळेच गती मिळाल्याचे माजी नगरसेवक खुर्शीद आलम यांनी पत्रकात म्हटले आहे. सबस्टेशनचे श्रेय देखील कृती समितीलाच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असुन मुख्य रेल्वेस्थानक पालवन रोडवर होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

घरकुलाच्या अर्जाची मूदत वाढवा :बाबा चंदन मूदतवाढ देणार- नगराध्यक्षा अर्चना राळेभात

जामखेड, (प्रतिनिधी):-पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूलासाठी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आपल्याला घरकुल मिळणार अशा अपेक्षेने नागरिक आपले रोजंदारीचे काम सोडून घरकूलासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. कोठेही एका चक्कर मध्ये काम होत नाही.

माझी अटकच बेकायदेशीर- छगन भुजबळ; न्यायासाठी सुप्रीम कोर्टात धाव, आज सुनावणी

मुंबई, (प्रतिनधी):-मला झालेली अटक ही बेकायदेशीर आहे.तसेच नियमाचे उल्लंघन करणारी आहे,असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.छगन भुजबळ यांच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.त्यामुळे सुप्रीम कोर्ट तरी भुजबळांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा

बीड, (प्रतिनिधी):- सासरच्या लोकांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयातील तिसरे अप्पर जिल्हा न्यायाधीश यु.टी.पौळ यांनी हा निकाल दिला आहे. शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील ए.जी.धस यांनी बाजू मांडली.

वाहतुक शाखेचे पोनि.बुधवंत यांची कारवाई; ५८ दुचाकी संशयास्पद आढळल्या

बीड, (प्रतिनिधी):- येथील वाहतुक शाखेने चोरीच्या मोटारसायकलींचा छडा लावण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपासुन तपासणी मोहिम हाती घेतली आहे. रस्त्यावरील मोटारसायकलींना थांबवून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली जात आहे. दोन महिन्यांमध्ये साडे आठ हजार मोटार सायकलींची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये ५८ दुचाकी संशयास्पदरित्या त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील एक गाडी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान तपासणीच्या दृष्टीने सदरील मोहिम राबविण्यात आलेली असुन वाहनधारकांनी कागदपत्र दाखवून सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेचे पोनि.सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात अजुनही ‘ती’ नकोशीच! शेतात आढळले स्त्री जातीचे जिवंत अभ्रक

बीड, (प्रतिनिधी):- बेटी बचाओ, बेटी पढाओ यासह शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा’ असा संदेश दिला जात असुनही बीड जिल्ह्यात अजुनही ‘ती’ नकोशीच असल्याचा प्रकार समोर आला आहे. मैंदा पोखरी (ता.बीड) येथील एका शेतात टोमॅटोच्या फासामध्ये एका दिवसाचे स्त्री जातीचे जिवंंत अभ्रक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेथील ग्रामस्थांनी सदरील अभ्रक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान सदरील अभ्रक कोणी आणि केंव्हा आणून टाकले याचा तपास पोलिस सुत्रांकडून सुरु आहे. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

खा.प्रितम मुंडेंसह आमदार, पदाधिकार्‍यांचा अन्नत्याग

बीड, (प्रतिनिधी):- संसदीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याने आज सत्ताधारी भाजपच्या वतीने दिल्लीपासून गल्लीपर्यंत लाक्षणिक उपोषण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन करीत येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरही या लाक्षणिक उपोषणास सुरवात झाली आहे. खा.डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार आणि पदाधिकार्‍यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे.

एमआयडीसीने नवीन जागा अधिग्रहण करावी -आ.मेटे

बीड (प्रतिनिधी): बीड शहरात होवु घातलेला रेल्वे मार्ग व राष्ट्रीय महामार्गांची निर्मीती या मुळे जिल्हयात आता नवीन उद्योग निर्मीतीसाठी पुरक वातावरण निर्माण होवु लागले आहे. वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी व जिल्हयातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी उद्योग धंदयांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जिल्हयाच्या विकासात अर्थपूर्ण भर घालण्यासाठी एम.आय.डी.सी.चे विस्तारीकरण करावे व यासाठी एम.आय.डी.सी.ने किमान २०० हेक्टर नवीन जागा अधिग्रहण करावी अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली आहे. 

बन्सीधर नगर मधील जलकुंभाचे डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते भुमिपुजन

बीड, (प्रतिनिधी):- अमृत अटल योजनेतर्ंगत सुरु असलेल्या जलकुंभ व पाईपलाईन कामापैकी बन्सीधर नगर येथील जलकुंभाच्या बांधकामाचे भुमिपुजन आज नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या जलकुंभाची क्षमता १४.२० लक्ष लिटरची आहे. यामुळे शाहूनगर परिसरातील या भागाचा पाणीप्रश्‍न मिटणार आहे.

स्काऊट -गाईड राज्य आयूक्त पदी संतोष मानूरकर यांची नियुक्ती

बीड,(प्रतिनिधी ):-महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट -गाईड संस्थेच्या राज्य आयूक्त (स्काऊट) या पदावर बीड येथील संतोष मानूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, स्काऊटचे  राज्याचे  अध्यक्ष  ज्ञानोबाजी मुंडे,राज्य  मुख्य आयूक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते मानूरकर यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले. 
.

Pages