बीड शहर

फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांना पितृशोक

बीड, (प्रतिनिधी):- येथील नवी भाजीमंडईतील फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांचे वडिल अब्दुल रज्जाक बागवान (लल्लूभाई) यांचे आज सकाळी र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. आज रात्री ८.३० वाजता (इशाच्या नमाजनंतर) त्यांचा तकिया कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे.

समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदारांचे जिल्हाकचेरीसमोर धरणे

बीड, (प्रतिनिधी):- समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व मल्टीस्टेटमधील ग्राहक, गुंतवणूकदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. फसवणूक प्रकरणानंतर सर्व गुंतवणूकदारांनी पैसे परत करण्याची मागणी केली असुन यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण महिलांना अच्छे दिन - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी, (प्रतिनिधी):-      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांची त्रासदायक धुरातुन मुक्तता करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना मोठ्या प्रमाणावर राबविली या महत्वाकांक्षी योजनेमुळे महिलांना अच्छे दिन आले असून यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज वाघाळा (ता. परळी वैजनाथ ) येथील कार्यक्रमात बोलताना केले. 

हंगामी वस्तीगृहाचा निधी तात्काळ वर्ग करा आ.जयदत्त क्षीरसागरांची आढावा बैठकीत सूचना

बीड, (प्रतिनिधी):- ऊसतोड कामगांराच्या मुलांसाठी शासनामार्फत चालू केलेल्या ७० वस्तीगृहाचे १ कोटी ९० लक्ष ११५३४ रूपये अद्याप पर्यत वाटप करण्यात आले नाही. हा निधी कोणत्याही प्रकारची अर्थिक देवाण घेवाण न करता तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.

गर्भपातासाठी छळ; जाळून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- गर्भपात करण्यासाठी वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय विवाहितेने जाळून घेतले होते. आज पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बीडमधील गोंधळ भोवला; दोन पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

बीड, (प्रतिनिधी):- येथील पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरिक्षक कक्षात मोटारसायकल घुसवून गोंधळ घालणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध दुपारी उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विद्यार्थीनीचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात बुडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी धानोरा खुर्द येथे घडली. विद्युत पंपाच्या पाईपला तिचा मृतदेह आढळून आला आहे.

नगराध्यक्षांमुळे नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना यश

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील इस्लामपुरा भागामध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना  यश आले असुन गेल्या अनेक महिन्यांपासुन सदरील कामाविषयी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

बीड जिल्हा प्रशासनाला प्रधानमंत्री ऍवार्ड!

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी; नागरी सेवा दिनी होणार जिल्हाधिकार्‍यांचा गौरव

कामे होवू लागली आमच्यामुळे श्रेयासाठी आघाडीची धडपड-सभापती शेख महंमद

बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिकेत सुरुवातीला आम्ही स्वतंत्र गट स्थापन करुन शहर विकासासाठी सत्तेत आघाडीबरोबर राहिलोत मात्र कुठल्याही कामात स्वत:ची टिमकी वाजवून घेवून श्रेय लाणण्याचा उद्योग आघाडीकडून होवू लागला. शहर विकास तर दूरच पण स्वार्थी राजकारणासाठी सत्तेचा उपयोग होसवू लागला. त्यामुळे शहराचा विकास थांबला, वर्षभरानंतर आम्ही केवळ शहरातील समस्या आणि महत्वाची कामे मार्गी लागावेत यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या बरोबर  राहण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण शुल्काच्या चौकशीसाठी समाजकल्याण मंत्र्याचा पुतळा जाळणार-डॉ.ओव्हाळ

बीड, (प्रतिनिधी):- शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषानुसार महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध न करता समाजकल्याण विभागाने बीड जिल्ह्यासाठी सहा कोटींचा निधी दिला असुन आदित्य एज्युकेशन संस्थेने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या दिड लाख रुपयांचा निधी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या नावावर वर्ग करण्यात येत असुन शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषाची चौकशी न करता निधी वाटप केला जात आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यांचा उपोषणाचा आज नववा दिवस; २१ तारखेला मुंबईत आरोग्यमंत्री, वित्तमंत्री यांच्यासमवेत संघटनेची बैठक

बीड, (प्रतिनिधी):- राज्यातील १८ हजार कंत्राटी कर्मचारी यांनी दि.११ एप्रिलपासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बीड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून आज आंदोलनाचा ९ वा दिवस आहे. विविध मागण्यांसदर्भात कंत्राटी कर्मचारी यांनी तिव्र आंदोलन उभारले असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.

मा.न्यायालय व राज्य माहिती आयोग नगर परिषदेच्या भ्रष्टाचार्‍यावर कार्यवाहीच्या तयारीत- शेख निजाम

बीड, (प्रतिनिधी):- बीड नगर परिषदेमध्ये ३० ते ४० वर्षापासून क्षीरसागर कुटुंबियाची सत्ता आहे. सदरील लोकांनी जनतेने दिलेल्या सत्तेचा उपयोग त्यांनी लोकांची कामे न करता, स्वत:च्या फायद्याची कामे करून स्वत:ला मालामाल बनवून शहराला भिकारी बनवन्याचे काम केले आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना फक्त कागदावर दाखवून त्याचा निधी गडप केला.

गडकरींच्या भाषणाकडे जिल्ह्याचे लक्ष; होणार जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्नपुर्ती

बीड, (प्रतिनिधी):- साडे चार हजार कोटींच्या विकास कामाचे भुमिपुजन सोहळ्यासाठी केंद्रियमंत्री नितीन गडकरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाजोगाईत होत आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राहिलेले गडकरी मुंडेंच्या जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती करणार आहे. त्या अनुषंगाने दोघांच्या वित्रुष्टाला विकास कामाच्या माध्यमातून आहूती दिली जाणार आहे.  लोकनेत्या ना.पंकजा मुंडे यांच्या चाणक्यनितीचा फायदा जिल्ह्याच्या विकासातून होणार आहे.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष बीड मुळे राम आला स्वगृही

परळी शहरातुन हरवलेला 10 वर्षीय बालक राम शाम चौरे हा डिसेंबर 2017 मध्ये हरवला होता तो मध्यप्रदेशातील इटारसी शहरात आढळून आला त्यानी जिल्हा बाल सरक्षण कक्ष बीड शी सम्पर्क साधला त्या नुसार त्याचा फोटो मागून घेतला व त्याची संपूर्ण चौकशी केली असता तो बालक परळी शहरातील असल्याचे समजले मग मध्यप्रदेश मध्ये सतत सम्पर्क साधून मध्यप्रदेश विशेष बाल पोलिस पथकातील विजयसिंह रघुवंनशी (ASI)ईटारसी,भूरेलाल धुर्वे मध्यप्रदेश हे या बालकाला घेऊन बीड ला आले या बालकाला बाल कल्याण समिती बीड समोर हजर करण्यात आले सध्या या बालकाला शासकीय बालग्रह बीड या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

बीडच्या कचराप्रश्‍नी माजी आ.सय्यद सलीम यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका शासनासह जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस अधिक्षकांना नोटीस 

बीड (प्रतिनिधी)- शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याप्रश्‍नी माजी आ. सय्यद सलीम यांनी उच्च न्यायालयात ऍड. सय्यद तौसिफ यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आसुन न्यायालयाने त्याची दखल घेत प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादींमध्ये शासनासह शहर विकास विभाग, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस अधिक्षक आदींचा समावेश असुन पुढील सुनावणी दि. २६ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

पिंपळनेरवासियांचा महामार्गावर दोन तास ठिय्या

तालुका निर्मितीची मागणी; माजीमंत्री बदामराव पंडितांसह अनेकांची मागणी

बीड जिल्ह्यात भोंदू बाबाकडून मुलीवर अत्याचार पिडीतेवर जिल्हा रुग्णालयात उपचार; सर्वत्र खळबळ

बीड, (प्रतिनिधी):- आजार बरा करतो असे म्हणत एका भोंदूबाबाने १५ वर्षीय मतिमंद मुलीला स्वत:कडे ठेवून घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारी उघडकीस आला आहे. पिडीत मुलीवर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन दुपारनंतर पोलिस तिचा जबाब नोंदवणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दुपारीच मुक मोर्चा काढण्यात आला होता.

‘देखो बेटीयों, बीड वालोंने इंन्सानियत जिंदा की...!’

बीड, (प्रतिनिधी):- ‘बचेगी बेटी तो पढेगी बेटी, जस्टीस फॉर आसिफा, जस्टीस फॉर उन्नाव, बलात्कारीयोंका साथ देनेवाले को देशद्रोही करार दो, गुन्हेगारांना फासावर लटकवा’ अशा विविध प्रकारच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन निघालेल्या सर्व धर्मिय, सर्व पक्षीय मोर्चाने ‘देखो बेटीयों, बीड वालोंने इंन्सानियत जिंदा की...!’ हे अख्या देशाला दाखवून दिले. अतिशय शिस्तबद्ध आणि सामुहिकरित्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाने बलात्कार्‍यांना गर्भीत ईशारा देत निषेध नोंदवला.

बीडमधील मूक मोर्चात  मराठा क्रांती मोर्चाही सहभागी 

मुलींच्या संरक्षणासाठी एक होण्याचे आवाहन 
————————————————————
बीड, (प्रतिनिधी):- जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. उन्नाव आणि सुरत मध्येही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ आज  मंगळवार दि. 17 एप्रिल रोजी सर्व पक्षीय ,सर्व धर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाही यामध्ये सहभागी होणार असून भारतीय मुलींच्या संरक्षणासाठी आजच्या मोर्चात मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Pages