पाटोदा

सोशलमिडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट पाटोदा पोलिसात तीन तरुणावर गुन्हा दाखल

पाटोदा -: (सिटीझन) 
पाटोदा पोलिस स्टेशन हद्दीत सोशल मिडियावर  धर्मियांत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने पाटोदा तालुक्यातील तीन तरुणांवर सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा नोंद करुण पि आय सिध्दार्थ माने यांनी धाडसी कार्यवाही करुन एका तरुणांस महासांगवी येथुन अटक केली आहे .

मोटार सायकल अपघातात एक जण जागीच ठार

पाटोदा, (प्रतिनिधी):- पाटोदा तालुक्यातील थेरला जवळ शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ओंकार विठ्ठल हुडेकर वय ४३ रा.धामणगाव (बडे)ता.मातोळा जि.बुलढाणा  हे आपल्या मोटारसायकल क्र.चक२८ Aउ८४५० ने नगरहून बिडकडे जात असताना थेरला शिवारात त्यांच्या मोटरसायकल ला अपघाता झाला त्यामध्ये डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने  जागीच मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून अधिक तपास पो.हे.कॉ.आजीनाथ तांदळे करीत आहेत.

पाटोद्यातही मुकमोर्चा

पाटोदा,(प्रतिनिधी):- कठुआ आणि उन्नावसारख्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणी साठी मंगळवारी (ता.१७) पाटोदा शहरात सर्व धर्मीय मूक मोर्चा निघाला.   

पाटोदा शहरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

पाटोदा : अरुंद रस्ते त्यातच वाढलेले अतिक्रमण यामुळे बसस्थानकालगतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये मुख्य मार्गावरील अतिक्रमण हाटिवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा ; उपचाराविना एकाचा बळी

पटोदा, (प्रतिनिधी):- छातीमध्ये दुखत असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एकाला जीवाशी मुकावे लागल्याची घटना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा अंधाधुंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील लऊळवाडी येथील नानाभाऊ जगन्नाथ लऊळ (वय ५५) यांच्या छातीमध्ये रविवारी सकाळी अचानक दु:खु लागले होते.

नापिकीला कंटाळून पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या 

पाटोदा : तालुक्यातील तांबाराजूरी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. मागील काही दिवसांपासून ते अल्प शेती व सततची नापिकी याने आर्थिक विवंचनेत होते. 

पाटोदा नगर पंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नगरसेवकाचेच उपोषण

पाटोदा (प्रतिनिधी) येथील नगरपंचायत कार्यालयातील अनेक गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकानेच उपोषण सुरू केले आहे.