सोशलमिडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट पाटोदा पोलिसात तीन तरुणावर गुन्हा दाखल

पाटोदा -: (सिटीझन) 
पाटोदा पोलिस स्टेशन हद्दीत सोशल मिडियावर  धर्मियांत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने पाटोदा तालुक्यातील तीन तरुणांवर सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा नोंद करुण पि आय सिध्दार्थ माने यांनी धाडसी कार्यवाही करुन एका तरुणांस महासांगवी येथुन अटक केली आहे .
   आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथिल पाहुणे असलेल्या सात जणांस कोरोना संक्रमण झाले त्या सर्वांचा धर्माशी जोडुन तसेच गावाचे नावही धर्माशी जोडुन धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट फेसबुक सोशलमिडियावर झाली होती  .त्यानंतर पाटोदा पोलिसांनी पो. शि. कातखडे यांच्या फिर्यादीवरुन गणेश सानप रा महासांगवी,विशाल बांगर व मनोज बांगर या तीन तरुणांविरोधात गु र नः १०८/२० भा दं वि ५०५ सायबर गुन्हा दाखल करुन एका जणांस रात्रीच तीन वाजता अटकही केली .पि आय सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. कंठाळे हे तपास करत आहेत .

*********×**************×*****
 तरुणांनी सोशलमिडियाचा वापर विधायक कामासाठी करावा,धार्मिक  व जातीय तेढ निर्माण होईल असे काहीही आक्षेपार्ह लिखाण टाकु नये.कोरोना व्हायरस कुणा एका धर्माला संक्रमित करत नाही ,कोरोनाचा लढा आपण सर्व भारतिय म्हणुन लढु अन जिंकुही .सध्या गरिबांची उपासमार सुरु आहे ,त्यांच्यापर्यंत चार घास पोहच करण्यासाठी सोशलमिडियाचा वापर व्हावा ,हे काम दोन्हीही धर्मियांनी करावे.
  -  अॅड जब्बार पठाण वकील तथा समाजसेवक पाटोदा

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.