आष्टी

लंपी या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी गॉट फॉक्स लसीचा बूस्टर डोस म्हणून उपयोग करावा

आष्टी (प्रतिनिधी) -
महाराष्ट्रातील आठ जिल्हे व सव्वीस तालुके लंपी आजाराने संक्रमित झाले आहेत.  बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील एका गावात या आजाराने ग्रस्त असलेल्या गाई आढळल्या आहेत. यामुळे मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांननी लंपी या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी गॉट फॉक्स या लसीचा बूस्टर डोस म्हणून उपयोग करावा असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

Test news

Test news content

प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे यांचे सासरे कारभारी हंबर्डे यांचे निधन

आष्टी (सिटीझन) आष्टी 

येथील पंडीत नेहरु कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे यांचे सासरे कारभारी हंबर्डे यांचे शुक्रवारी 12.15 वाजता वृद्धापकाळाने निधन  झाले आष्टी येथील मुळ रहिवासी असलेले कारभारी हंबर्डे हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आष्टी येथील हंबर्डे वस्ती येथिल त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे, पोलीस दहातोंडे, इजारे सर यांचे ते सासरे होते त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

बाळासाहेब आजबेंच्या विरोधात सतीष शिंदेनी उमेदवारी दाखल केली

आष्टी (प्रतिनिधी):- येथील विधानसभा मतदारसंघात एका पाठोपाठ बंड होऊ लागले आहेत. भाजपमधील बंड नवा असतांनाच आता राष्ट्रवादीतही बंडाचा झेंडा फडकला आहे. बाळासाहेब आजबेंच्या विरोधात सतीष शिंदेनी उमेदवारी दाखल केली आहे. 

आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या सतिष शिंदेंनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.आज दुपारी सजवलेल्या गाडीतुन सतिष शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

टाकळीअमिया येथील शाळेची पडवी पडल्याने तीन विद्यार्थीनी जखमी

आष्टी (प्रतिनिधी) :-परिपाठानंतर शाळेतील वर्गखोलीबाहेर रांगोळी
काढणा-या मुलींच्या अंगावर पडवीचा खांब सटकल्याने त्यावरील पत्रे कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमियां येथे आज दि. 3 जानेवारी सकाळी 11 चे सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना उपचारार्थ कडा येथे हलविण्यात आले आहे.

दोन रस्त्यांचे काम मी मंजुर करुन आणले आहे. त्याचे श्रेय आमदारांनी घेवू नये

आष्टी (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक फेक अकाउंटवरुन सोशल मिडीयावर झळकत आहेत. त्यांना ५० हजार लाईक मिळतात मात्र त्या लाईक पैसे देवून मिळवतात असा आरोप आ.सुरेश धस यांनी केला आहे. यावेळी धस यांनी भाजप आ.भिमराव धोंडे यांच्यावरही नाव न घेता जोरदार टिका केली. वनवेवाडी ते हिंगणी आणि देऊळगाव घाट ते मच्छिंद्रनाथ गड या दोन रस्त्यांचे काम मी मंजुर करुन आणले आहे. त्याचे श्रेय आमदारांनी घेवू नये असा टोलाही धसांनी लगावला.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधीतुन ना.गडकरी मंजुरी देणार-आ.भीमराव धोंडे

आष्टी,(प्रतिनिधी):-आष्टी मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी मधुन मंजुरी देणार असल्याचे केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना.नितिन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती आ.भीमराव धोंडे यांनी दिली.

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याकडूनच अत्याचार

बीड, (प्रतिनिधी):- स्वत:च्याच अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पित्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आष्टीत शोभेच्या दारूचा  भीषण स्फोट; तिन ठार ?

आष्टी  (प्रतिनिधी) आष्टी शहरातील शेकापुर रोडलगत काही शोभेची दारू विक्री करणाराचे घरे आहेत.त्या घरातील दारूच्या फट्याक्याना आज  दुपारी 4:30 च्या दरम्यान आग लागली असून वेगवेगळे आवाज त्या भागातून येते आहेत. स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे यांचा अंदाज नाही.पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली असून कशामुळे हा प्रकार झाला हे समजू शकले नसले तर या दुर्घनेत तिन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Pages