आष्टी

आष्टीत आ.धोंडेंच्या आमसभेत शेतकर्‍यांचा आक्रोश

तक्रारींचा भडीमार; शंभर शौचालये नुसते कागदावरच; कुपोषणाचा विषयही ऐरणीवर
आष्टी, (प्रतिनिधी):- शौचालयासह मुलांच्या उपोषणाचा प्रश्‍न मांडत शेतकर्‍यांनी आमसभेत आक्रोश केला. सार्वजनिक समस्यांसंदर्भात प्रत्येकाने तक्रारी उपस्थित करत आ.भिमराव धोंडे यांच्यासमोरच तक्रारींचा पाढा वाचला. या आमसभेस तालुक्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बस थांबविण्यावरून चालकास मारहान

आष्टी, (प्रतिनिधी):- बस थांबा असूनही बस का थांबविली जात नाही म्हणून चालकास दोन अज्ञात इसमांनी मारहान केल्याची घटना तालुक्यातील धानोरा येथे सोमवारी घडली आहे. चालक लक्ष्मण दगडू जानराव हे कळंब (जि.उस्मानाबाद) आगाराचे असून सोमवारी ते धानोरा येथे बस घेऊन आले असता बसथांबा असतानाही बस का थांबविली नाही म्हणून त्यांना दोघांनी शिवीगाळ करून मारहान केली आहे.

आष्टीत नगरपंचायत कर्मचार्‍यांचे गेट बंद, काम बंद

आष्टी, (प्रतिनिधी):- वेतन कायद्याप्रमाणे नगरपंचायत कर्मचार्‍यांना वेतन द्यावे, पाच वर्षापासुनची थकीत रक्कम द्यावी या मागणीसाठी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून गेट बंद, काम बंद आंदोलन केले.

भाव मिळेना; पांढरी जवळ काकडी, वांग्याचा सडा!

आष्टी : शेतकर्‍यांनी पिकावलेल्या ङ्गळ भाज्यांना भाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी वांगे, काकडी रस्त्यावर टाकून दिले.भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर ही वेळ आल्याची प्रतिक्रिया शेतकरी रंगनाथ काकडे यांनी दिली. दरम्यान शेतमालाला कुठेच भाव मिळत नसून केंद्र आणि राज्य सरकार या प्रश्‍नी केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिस निरीक्षकासह तिघांविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

आष्टी, (प्रतिनिधी):- महिला पोलिस कर्मचार्‍यावर अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह पोलिस शिपाई गडकर आणि अन्य एका विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

मोटारीने दुचाकीला ठोकरले; सासरा, सून जागीच ठार

तळेगाव ढमढेरे (पुणे) दुचाकीला मोटारीने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रेय सोनबा भुजबळ (वय 52) व मोहिनी अतुल भुजबळ (वय 24, दोघे. रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक पुणे 46, मूळगाव टाकळसिंग, ता. आष्टी, जि. बीड) हे सासरा व सून असे दोघे जागीच ठार झाले. कासारी फाटा (ता. शिरूर) येथे चोविसावा मैलाजवळ पुणे-नगर रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी ही दुर्घटना घडली. राजू सोनबा भुजबळ (रा. सणसवाडी, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली

सरसकट कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे मुख्यमंञ्यांना निवेदन

मुंबई :-सरसकट कर्जमुक्तीची अंमलबजावणी करुन रेडी रेकनर नुसार नवीन शेतीकर्जाचे वाटप सुरु करा,१९ जून २०१७रोजी काढलेल्या परिपञकाप्रमाणे गायीच्या दुधाला २७ रुपये लिटरप्रमाणे भाव न देणाऱ्या दुधसंघावर कारवाई करा तसेच प्रतिलिटर १०/-रुपये प्रमाणे मागिल सहा महिन्याची फरकाची रक्कम द्या, कांद्यावरिल एम ई पी काढून शेतीमालावरिल निर्यातबंदी कायमची उठवा,बैल हत्त्याबंदी कायद्याचा फेरविचार करा,ऊसाचा पहिला हप्ता महाराष्ट्रभर समान द्या, बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी आणि वीजबिलासाठी शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन कापू नये या मागण्याकरिता शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मुंबईत मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस या

रस्ते विकास आराखड्यासंदर्भात विजय गोल्हार यांनी घेतली बैठक..!

आष्टी -  (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषद अध्यक्षपती श्री.विजय गोल्हार यांनी आज पंचायत समिती कार्यालयात अधिकारी,पदाधिकारी व सरपंचांची बैठक घेतली.साधारणत: दर 20 वर्षांनी शासनाच्या बुकलेटमध्ये गावोगावच्या मुख्य रस्त्यापासून प्रत्येक वस्तीवर जाणा-या रस्त्यांचा यामध्ये समावेश होत असतो ,तो सन 2000 साली झालेला होता आणी आता तो सन 2021ला होणार होता परंतु ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करुन आपल्या जिल्ह्यासाठी तो समावेश लवकर करण्याचा निर्णय झाला आहे.रस्त्याचा शासनाच्या बुकलेट मध्ये समावेश झाल्या नंतरच रस्त्याच्या विकासकामांवर निधी देता येतो.असे झाल्यास जास्तीत जास्त रस्ते होऊन गावच्या वस्तीरस

Pages