Add new comment

बस थांबविण्यावरून चालकास मारहान

आष्टी, (प्रतिनिधी):- बस थांबा असूनही बस का थांबविली जात नाही म्हणून चालकास दोन अज्ञात इसमांनी मारहान केल्याची घटना तालुक्यातील धानोरा येथे सोमवारी घडली आहे. चालक लक्ष्मण दगडू जानराव हे कळंब (जि.उस्मानाबाद) आगाराचे असून सोमवारी ते धानोरा येथे बस घेऊन आले असता बसथांबा असतानाही बस का थांबविली नाही म्हणून त्यांना दोघांनी शिवीगाळ करून मारहान केली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने चालक लक्ष्मण जानराव यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञातांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक ङ्गौजदार राठोड अधिक तपास करीत आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.