क्रीडा

भुवनेश्वर कुमार या विजयाचा शिल्पकार ठरला

पहिल्या टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. भुवनेश्वर कुमार या विजयाचा शिल्पकार ठरला होता.

४ ओव्हरमध्ये १० डॉट बॉल टाकत त्याने केवळ २४ रन्स दिले.

धोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे

जोहान्सबर्ग : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले. पण मागच्या काही काळापासून धोनी माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. धोनीनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी मागणी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी केली होती. टीका होत असली तरी विकेट मागून धोनीचे सल्ले भारताच्या विजयात महत्त्वाचे ठरत आहेत.

द. आफ्रिकेचा 179 धावात खुर्दा, भारताची मालिकेत 3-0 ने आघाडी

केपटाऊन :(वृतसेवा) टीम इंडियाने केपटाऊनच्या वन डेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवून, 6 सामन्यांच्या मालिकेत सलग तिसरा विजय साजरा केला.

अंतिम फेरीतल्या शतकासह मनजोत कालरा ठरला ‘या’ विक्रमाचा मानकरी

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. या फेरीत भारताकडून विजयाचा हिरो ठरला. अंतिम फेरीत मनजोत कालराने १०१ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीसह मनजोत १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी दिल्लीच्या उन्मुक्त चंदने हा पराक्रम केला होता.

विजय हजारे चषकात हरभजन सिंहकडे पंजाबचं नेतृत्व, युवराज सिंह उप-कर्णधार

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहकडे विजय हजारे चषकात पंजाबचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. ७ ते १६ फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकच्या अलुर येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यासाठी पंजाबच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी युवराज सिंहकडे संघाच्या उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या स्पर्धेत पंजाब ७ फेब्रुवारीरोजी आपला पहिला सामना हरयाणाविरुद्ध खेळणार आहे.

विश्वचषक विजेत्या संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव

मनजोत कालराने अंतिम सामन्यात केलेलं शतक आणि त्याला इतर भारतीय फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील चषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात विजयासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाने २१७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात लिलया पार केलं.

ऑस्ट्रेलियास धास्ती भारताच्या वेगवान गोलंदाजांची

ख्राईस्टचर्च : भारताविरुद्धच्या सामन्याची पूर्वतयारी आणि त्या वेळी फिरकीऐवजी जलदगती गोलंदाजांबाबत जास्त चर्चा, याची आम्हाला काय कोणालाच सवय नसेल. भारताचे हे वेगवान गोलंदाजच आमच्यासाठी आव्हान असतील, असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य मार्गदर्शक रायन हॅरीस यांनी सांगितले. विश्‍वकरंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील विजयी सुरवात भारताने ऑस्ट्रेलियास हरवून केली होती.

आयपीएल लिलाव: १६९ खेळाडू, खर्च ४३२ कोटी

नवी दिल्ली: आयपीएल लिलावाचा दुसरा दिवसही खास ठरला. भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट याला राजस्थान रॉयल्सनं तब्बल साडेअकरा कोटी रुपयांना खरेदी केलं. तो आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्यानं के. एल. राहुल आणि मनीष पांडे यांनाही मागं टाकलं.