बीड शहर

नाहेद बागवान यांना पितृशोक

नाहेद बागवान यांना पितृशोक 

शिवाजीनगर पोलीसांनी अवैध गुटखाविक्री वर कारवाई करुन मुद्देमाल जप्त केला

बीड (प्रतिनिधी) दिनांक 21/01/2025 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड हद्दीत एक इसम हा अवैधरित्या गुटख्याची विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय बातमी मीळाल्यावरुन पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील डी. बी. पथकातील पोलीस हवादार /1664 रविंद्र आघाव, पो.शि. 2077 बाळु रहाडे, पो.शि. 983 सुदर्शन सारणीकर, पो.शि. 904 लिंबाजी महानोर यांना कारवाई करण्याबाबत आदेशीत केल्याने डी. बी. पथकातील अंमलदार यांनी नगर नाका येथे मिळालेल्या बातमीच्या सापळा लावुन गुटखा विक्रीसाठी सुझुकी ऑक्सेस गाडी क्र.

सोशल मिडीयावरुन दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्यास अथवा फॉरवर्ड केल्यास होणार कठोर कारवाई

सोशल मिडीयावरुन दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्यास अथवा फॉरवर्ड केल्यास होणार कठोर कारवाई

पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडून जनतेला आवाहन 

न्युरोसर्जन डॉ. समीर शेख यांना मातृशोक

न्युरोसर्जन डॉ. समीर शेख यांना मातृशोक

बीड दि.25 ( प्रतिनिधी) शहरातील काकू नाना हॉस्पिटल मधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. समीर शेख यांच्या आईचे बुधवारी दि.25 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले आहे. उद्या गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी पहाटे 7 वाजता ( फजरच्या नमाज नंतर) नर्सरी रोडवरील तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.
बीड येथील काकू नाना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.डॉ.शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

बीडमधून संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी

 

बीडमधून संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी

बीड ( प्रतिनिधी) बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा केली आहे गेल्या काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित होते अनेक तर्क वितर्क लावले जात होते काही चर्चा देखील घडवून आणल्या जात  होत्या मात्र आज दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संदीप क्षीरसागर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

चौसाळा येथील सेवानिवृत्त लाईनमन युनूस पठाण यांचे निधन

चौसाळा येथील सेवानिवृत्त 
लाईनमन युनूस पठाण यांचे निधन

बीड दि.19 (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील सेवानिवृत्त लाईनमन युनुस इस्माईल पठाण यांचे बुधवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. आज गुरुवार दि.19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता चौसाळा येथे त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात  पत्नी , जावेद पठाण, अजीज पठाण ही दोन मुले, चार मुली , सुना , नातवंडे , जावई असा परिवार आहे. सायं दै. सिटीझनचे कार्यकारी संपादक चंदन पठाण यांचे ते सासरे होते.

काकू - नाना हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सय्यद बशीर यांना पितृशोक

काकू - नाना हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सय्यद बशीर यांना पितृशोक

सय्यद बिलाल उर्फ कट्टुभाई यांचे निधन 

भाजप नेते शेख फारूक यांना पितृशोक

भाजप नेते शेख फारूक यांना पितृशोक
बीड (प्रतिनिधी);- येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष शेख फारूक यांचे वडिल शेख शब्बीर शेख आजम यांचे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेख शब्बीर शेख आजम यांचा दफनविधी आज शुक्रवार दि..12 जुलै रोजी सायं.5.30 वा.(नमाज-ए-असर) तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये करण्यात येणार आहे. शेख कुटूंबीयांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे. 

 

बीडमध्ये ऍड. पटेल दाम्पत्यासह चौघांकडून घरात घुसून धुडगुस

बीडमध्ये  ऍड. पटेल दाम्पत्यासह 
चौघांकडून घरात घुसून धुडगुस

महिलेला दमदाटी ; ऍड. पटेल पती - पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

बीड दि.20 ( प्रतिनिधी ) कुटुंबातील कोणीही घरात नसताना बळजबरीने आत घुसून  धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत तुझ्या घरच्यांना बघून घेऊ असे म्हणत वकील दांपत्यासह चौघांनी धुडगूस घातल्याचा प्रकार पेठ बीड हद्दीत घडला. याप्रकरणी वकील ऍड.नासेर पटेल , त्यांची पत्नी आसमा पटेल यांच्यासह शरद झोंडगे , पायल पारवे या चौघाविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका वकील दांपत्यावर पुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बीडमधून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर

बीडमधून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर

बीड दि.13 - बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांपासून पंकजाताई की प्रीतम ताई अशी चर्चा होती अखेर या चर्चांना पूर्णविराम पक्षाने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या ऐवजी पंकजाताईंना उमेदवारी देण्यात आली आहे जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे 

गावठी कट्टा व तीन जिवत काडतुसासह एक ताब्यात ;बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकिचा अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छ. संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देवून मार्गदर्शन केले आहे.

 

Pages