धारूर

कठुआ, उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ धारुर येथे मुक मोर्चा

धारुर, (प्रतिनिधी):- उत्तरप्रदेशातील उन्नाव,गुजरात येथे महिलेवरील अत्याचार आणि जम्मू काश्मिरमधील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ धारुर येथे आज शुक्रवार २० एप्रिल रोजी सर्व धर्मीय व सर्व पक्षीयच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. यावळीे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती केंद्र सरकारला निवेदन सादर करून या प्रकरणी जलदतगतीने न्यायालयात खटले चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

बंजारा समाजातील शिक्षिका सविता राठोड याना राज्यस्तरीय पुरस्कार

बीड ( प्रतिनिधी) औरंगाबाद येथील बोधी एज्युकेशन फाऊंडेशन वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार धारूर येथील शिक्षिका सविता राठोड याना मिळाला असून बंजारा समाजातील शिक्षिकेला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे