लाइव न्यूज़
कठुआ, उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ धारुर येथे मुक मोर्चा
धारुर, (प्रतिनिधी):- उत्तरप्रदेशातील उन्नाव,गुजरात येथे महिलेवरील अत्याचार आणि जम्मू काश्मिरमधील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ धारुर येथे आज शुक्रवार २० एप्रिल रोजी सर्व धर्मीय व सर्व पक्षीयच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. यावळीे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती केंद्र सरकारला निवेदन सादर करून या प्रकरणी जलदतगतीने न्यायालयात खटले चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
उन्नाव,गुजरात आणि कठुआ येथील घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित मूकमोर्चासाठी तालुकाभरातील सर्व धर्माचे लोक एकत्रित झाले होते. धारुर येथील नगर परिषद पासुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
नगर परिषद पासुन निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्यमार्गाने शांततेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन पोहोचला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जम्मू काश्मिरमधील कठुआ येथील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणार्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशातील उन्नाव व गुजरात येथील अत्याचार प्रकरणात कोणत्याही आरोपीची गय न करता पिडित महिलेवरील अत्याचार व पिडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील दोषींना मृत्यूदंड व कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करावी. वरील दोन्ही प्रकरणांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ शिक्षणा द्यावी, तसेच या प्रकरणांत गुंतलेल्या आरोपींचे मताधिकारही रद्द करावेत, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
Add new comment