बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांकडून विकत घेतला साडेतीन लाखाचा भाजीपाला!

परळी ( सिटीझन )- : भाजीपाला विकण्यासाठी तालुक्याला भाजीपाला मंडई मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातील आपला भाजीपाला विषम संख्येच्या पार्श्वभूमीवर तोडणी केलेली होती कारण भाजी मंडई चालू ठेवण्यात येणार होती.परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी बीट बंद करण्याचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक आदेशित केल्याने चांगलीच अडचण झाली होती. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ही बाब कळताच परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तो संपूर्ण 3 लाख 50 हजार रुपयांचा भाजीपाला बाजार भावानुसार विकत घेतला आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.