लाइव न्यूज़
शिवम इंटरप्राईज या दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे शालेय साहित्य जळुन खाक

परळी वैजनाथ
शहरातील अरुणोदय मार्केट मध्ये असलेल्या शिवम इंटरप्राईज या दुकानाला गुरूवारी सकाळी आग लागल्याने लाखो रुपयांचे शालेय साहित्य जळुन खाक झाले आहे. लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठे प्रयत्न केले.
अरुणोदय मार्केट मधील शिवम इंटरप्राईजेसला आज सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. दुकान बंद असल्याने सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.
Add new comment