बीड जिल्ह्याने आणखी एक नेता अपघातात गमावला
बीड जिल्ह्याने आणखी एक नेता
अपघातात गमावला
माजी आ. आर. टी. देशमुख यांचे अपघाती निधन
माजलगाव मतदारसंघावर शोककळा
बीड जिल्ह्याने आणखी एक नेता
अपघातात गमावला
माजी आ. आर. टी. देशमुख यांचे अपघाती निधन
माजलगाव मतदारसंघावर शोककळा
डॉ.जाजू दाम्पत्याचा पापाचा घडा अखेर भरलाच!
जाजू हॉस्पिटल मधील प्रसूती दरम्यान महिला,बाळ मृत्यू प्रकरण आले अंगलट.
उपचार करण्याची पद्धती माहीत नसताना उपचार केल्याचा ठपका ठेवत शहर पोलिसात गुन्हा दाखल.
माजलगाव प्रतिनिधी दि.16
पोलिसांनी सावरगावनजीक केली कार्यवाही.
माजलगाव (प्रतिनिधी0 दि.12
शेती उपयोगी जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा आयशर पोलिसांनी पकडला.ही कार्यवाही तालुक्यातील सावरगाव येथील महामार्गावर रविवार दि.11 रोजी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान केली.
नवीन बस स्टँड परिसरात घडली होती घटना.
राज गायकवाड माजलगाव.
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका युवकाला चाकू दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील नवीन बस स्टँड परिसरात 23 मार्च रोजी घडली होती.दरम्यान सदरील जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान 26 मार्च रोजी मृत्यू झाला आहे.मृत व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून तिघाजना विरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव,दि.30 ः तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रांपचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही वेळ बाकी असतांना अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातून हिसकावून घेत पळ काढत तहसिल कार्यालय आवारातच फाडल्याची घटना बुधवारी सायं.4.30 वा. दरम्याण घडली.
माजलगाव :(सिटीझन) कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता आणि पोलीस यंत्रणा चे काम पाहता शहर व ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी वर्गा करिता डी वाय एस पी श्रीकांत ढिसले यांच्या कल्पकतेतून निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली.आजपासून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभारल्या गेलेल्या या( बॉडी डिसीन्फेक्शन टूनल) निर्जंतुकीकरण कक्षाची सुरुवात झाली.
माजलगाव, (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. एका कार्यकर्त्याला त्यांनी काल सकाळी राष्ट्रवादीत घेतलं तोच कार्यकर्ता त्याच दिवशी दुपारी रमेश आडसकरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेला.
माजलगाव (प्रतिनिधी):- भाजप-महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी आज दुपारी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेली प्रचंड गर्दी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाशदादांची झोप उडवणारी होती. सर्वत्र भाजपचाच जयघोष सुरू असुन सोळंकेंच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. माजलगावमधील आजची गर्दी राष्ट्रवादीच्या काल झालेल्या रॅलीचे रेकॉर्ड मोडणारी होती. ही गर्दी पाहुनच आडसकर निघाले लढायला अन् प्रकाशदादा चला बघायला,असे कार्यकर्ते म्हणत होते.
माजलगाव दि.१७ ( प्रतिनिधी ) शहरा लगत आसलेल्या सिंधफना नदी च्या जुन्या पुलाचा वापर नसल्याचा गैर फायदा घेत पुलावरील लोखंडी कटडे व आयडिया कंपणी च्या केबलला लावलेल्या पाईप कापुन केबल चोरी केल्या वरुन अज्ञात चोरट्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात माजलगाव शहरातील जुजगर गल्ली भागात दोघांना ताब्यात घेतले आहे.
ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
------------------------------------
माजलगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : एकादशीच्या उपवासासाठी खालेल्या भगरीच्या पिठामुळे उमरी, रोषणपुरी, कोथरूळ येथील अनेकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दि. १७ दुपारी घडली. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात जवळपास ८० महिला, पुरुष रुग्णांवर उपचार सुरु असून यातील काही अत्यावस्थ रुग्णांना बीडच्या रुग्नालयात पाठविण्यात आले आहे.