चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला - तहसिल कार्यालय आवारातील घटना

माजलगाव,दि.30 ः तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रांपचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही वेळ बाकी असतांना अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातून हिसकावून घेत पळ काढत तहसिल कार्यालय आवारातच फाडल्याची घटना बुधवारी सायं.4.30 वा. दरम्याण घडली.
तालुक्यात पहिल्या टप्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवार दि.30 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच ऑनलाईन अर्ज दाखल करतांना सर्वर डाऊन होत असल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्विकारले. त्याकरिता सायं. 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला होता. सर्वच अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती. याच दरम्याण सायं. 4.30 वा. दरम्याण तहसिल कार्यालय आवारात दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी अशोक हरिनाथ कोमटवार हे आले असता, त्या ठिकाणी त्यांचे पुतणे अक्षय दिलीप कोमटवार, अजय दिलीप कोमटवार, अमित दिलीप कोमटवार यांनी अशोक  कोमटवार यांना धक्का-बुक्की करत गजुडीला धरत हातातील अर्ज हिसकावून घेतला. त्या ठिकाणाहून पळ काढत तहसिल कार्यालय बाहेर येवून अशोक कोमटवार व त्यांचा मुलगा निखिल अशोक कोमटवार या दोघांचा उमेदवारी अर्ज टरा-टरा फाडला. यामुळे तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.
यानंतर अशोक कोमटवार यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परत पुन्हा कागदपत्राची जमवा-जमव करत अर्ज भरला.  यावेळी त्यांना चांगलाच घाम फुटला होता. शेवटी त्यांनी वेळेत अर्ज दाखल केला.
--------------------------------

- पोलीसांची बघ्याची भुमिका, तर तहसिलदारांचे कानावर हात
उमदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या हातातील दोन उमेदवारी अर्ज घेवून त्यास मारहाण करत अर्ज फाडण्याची घटना तहसिल कार्यालय आवारात घडली. हि घटना होत असतांना समोरच उभा असलेल्या पोलीसांना अशोक कोमटवार बचावासाठी आवाज देत होते. मात्र उपस्थित पोलीसांनी याकडे डोळेझाक करून एक प्रकारे या घटनेला पाठबळ देण्याचे काम केले. तर तहसिलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार तहसिल कार्यालयात झाला नसून तो बाहेर झाला असल्याचे सांगत कानावर हात ठेवले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.