रमेश आडसकर यांनी आज दुपारी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

माजलगाव (प्रतिनिधी):- भाजप-महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी आज दुपारी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेली प्रचंड गर्दी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाशदादांची झोप उडवणारी होती. सर्वत्र भाजपचाच जयघोष सुरू असुन सोळंकेंच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. माजलगावमधील आजची गर्दी राष्ट्रवादीच्या काल झालेल्या रॅलीचे रेकॉर्ड मोडणारी होती. ही गर्दी पाहुनच आडसकर निघाले लढायला अन् प्रकाशदादा चला बघायला,असे कार्यकर्ते म्हणत होते.

माजलगावमध्ये आज दुपारी भाजप-महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उघड्या टॅम्पोमध्ये रमेश आडसकर, मोहनराव जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उभे होते. रॅलीमध्ये सर्वत्र भगवे,पिवळे,हिरवे,निळे झेंडे सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. मित्रपक्षांच्या सहकार्याने आडसकरांनी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी उशीरापर्यंत त्यांची रॅली सुरू होती. त्यानंतर होणार्‍या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या एका जिल्हापरिषद सदस्यासह अनेक पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.