Add new comment
प्रकाशदादांवर अशीही नामुष्की! ; एका कार्यकर्त्याला सकाळी राष्ट्रवादीत घेतलं तो दुपारी भाजपमध्ये गेला

माजलगाव, (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. एका कार्यकर्त्याला त्यांनी काल सकाळी राष्ट्रवादीत घेतलं तोच कार्यकर्ता त्याच दिवशी दुपारी रमेश आडसकरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेला.
माजलगाव येथील मोहन जगताप गटाचे सय्यद कालू पटेल यांनी काल दुपारी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी पटेल यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून प्रकाश सोळंकेंना दणका दिला. नगरसेवक बंधू असलेल्या पटेल यांना मानणारा मोठा वर्ग माजलगावमध्ये आहे.मात्र पटेल यांच्या एकाच दिवसाच्या दोन प्रवेशाने प्रकाशदादांवर मात्र नामुष्की ओढवली.
