मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू ;तिघाजना विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल.
नवीन बस स्टँड परिसरात घडली होती घटना.
राज गायकवाड माजलगाव.
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका युवकाला चाकू दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील नवीन बस स्टँड परिसरात 23 मार्च रोजी घडली होती.दरम्यान सदरील जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान 26 मार्च रोजी मृत्यू झाला आहे.मृत व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून तिघाजना विरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की 23 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून महेश सोळंके,मारुती सोळंके व अशोक सावंत यांनी भागवत आगे या पंचवीस वर्षेय युवकास महेश सोळंके सोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून शहरातील नवीन बस स्टँड येथे असलेल्या मुतारी जवळ भांडणाची सुरुवात झाली होती. यावेळी भागवत आगे यास दगडाने चाकूने अवघड जाग्यावर व कपाळावर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.दरम्यान जखमी भागवत आगे यास माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु त्याची बिघडलेली गंभीर परिस्थिती पाहता त्यास बीड येथील रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.बीड येथे तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.आज शुक्रवार रोजी त्याची प्रकृती अवघड जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिघडल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्याला अंबाजोगाईला हलविण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकांना दिला होता. दरम्यान जखमी भागवत आगे यास बीड वरून अंबाजोगाई कडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या हल्लेखोर 1महेश अशोक सोळंके,2मारुती अशोक सोळंके (राहणार फुले नगर) व अशोक सावंत राहणार (शिवाजीनगर) या तिघा जणांविरोधात मयत भागवत अशोक आगे याचा भाऊ विजय अशोक आगे यांनी शुक्रवार दिनांक 26 रोजी संध्याकाळी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदरील आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.
Add new comment