माजलगाव

माजलगावजवळ जिनिंगला आग; टेम्पोसह कापूस खाक

माजलगाव, (प्रतिनिधी):- शहरापासुन जवळच असलेल्या गढी रोडवरील मनकॉट जिनिंगला आज सकाळी आग लागली. भिषण आगीत टेम्पोसह कापूस जळून खाक झाल्याने अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी उशिरा आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले.

११ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा सापळा सापडला; रागातून सोडले होते घर

माजलगाव, (प्रतिनिधी):-  तालुक्यातील घळाटवाडी येथील अंकुश एकनाथ लंगे हा २१ तरुण रागाच्या भरात माझे लग्न का करत नाहीत असे म्हणून घरातून ११ दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला होता त्याचा हाडाचा सापळा घळाटवाडी शिवारात आढळून आला.

माजलगाव जवळ बसवर दगडफेक

माजलगाव,(प्रतिनिधी) :- बसच्या समोरील भागाच्या काचावर दगडफेक करून अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याची घटना दुपारी चिंचगव्हाण कॅनाल जवळ घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महेश कारखान्याविरूध्द शिवसेनेचे धरणे आंदोलन

माजलगाव, (प्रतिनिधी):- तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्वावरील असणार्‍या जय महेश साखर कारखान्याने डिसेंबरपासून गाळप केलेल्या उसाचे ११० कोटी रूपये थकविले असुन उस बिलाची रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी  धरणे आंदोलन करण्यात आले.लुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील तीन महिन्यांपासुन गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

पाञुड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या.

पात्रुड (प्रतिनिधी):- माजलगाव  तालुक्यातील पाञुड येथील विलास मधुकर काळे नावाच्या युवा शेतकऱ्यांने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
 

महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच विवाहितेला पेटविले

घरातील मंडळी कडी लावून पसार; महिला ९५ टक्के भाजली; मृत्यूशी झुंज

मतदासंघातल्या प्रलंबीत विकास कामांच्या संदर्भात उपविभागीय अधिका-यांना प्रकाश सोळंकेंनी दिले निवेदन

माजलगांव, दि. 6 प्रतिनिधी: माजलगांव मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामांच्या संदर्भात तसेच परडी माटेगांव, लवुळ या रस्त्यासाठी माजलगांव - तेलगांव या राष्ट्रीय महामार्गावर 14 मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिका-यांना दिला असुन बीड - परळी रेल्वे मार्गाचा शेतक-यांना योग्य मावेजा द्यावा यासह विवीध कामाच्या विषयावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचेशी एक तास सकारात्मक चर्चा केली.

ऊसाच्या पैश्यासाठी जयमहेश कारखान्यावर शिवसेनेचे 10 मार्चला धरणे आंदोलन

*◾*

माजलगाव,दि.6(प्रतिनिधी): जय महेश कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे माहे डिसेंबर पासुन ते आजपर्यंत गाळप केलेल्या 110 कोटी रुपये शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे थकविले आहेत ते शेतकर्‍यांना तात्काळ द्यावे.अन्यथा शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख सुधिर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली 10 मार्च रोजी शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थित भव्य धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने आप्पासाहेब जाधव व शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी वाय.आर.कदम यांच्याकडे यांना दिला आहे.

Pages