माजलगावमध्ये विवाहितेची आत्महत्या; चौघांविरूध्द गुन्हा

आरोपींच्या अटकेवरून अंत्यविधी रोखला
माजलगाव,(प्रतिनिधी): वीस वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रात्री शहरातील समता कॉलनी भागात घडली. सासरच्या लोकांनीच तिला मारल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आज दुपारी उशिरापर्यंत अंत्यविधी रोखला होता. या प्रकरणात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांंकडून मिळालेली माहिती अशी की, माजलगाव शहरातील समता कॉलनी येथील साधना अंकुर सोळंके (वय २० वर्षे) हिने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री घडली. सदर विवाहितेस हुंड्यासाठी सातत्याने त्रास दिला जात होता. छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी सासरच्या  लोकांनी तिला मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यविधी  रोखण्यात आला होता. आज सकाळीही नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. अखेर या प्रकरणात मयत विवाहितेचे वडील मनोहर साहेबराव घाडगे (रा.महाकळा, ता.अंबड) यांच्या फिर्यादीवरून पती अंकुर अर्जुन सोळंके, सासरा अर्जुनराव सोळंके, सासू शोभा अर्जुन सोळंके, कस्तुरबाई विलास सोळंके या चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनि. फड मॅडम या करित आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.