लाइव न्यूज़
शंभर फुटाच्या रस्ता मागणीवरुन माजलगावकरांचा रस्तारोको
माजलगाव, (प्रतिनिधी):- शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता शंभर फुटाऐवजी सत्तर फुटाचा करण्याचा खटाटोप संबंधित गुत्तेदाराकडून होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन शंभर फुटाचा रस्ता करावा अशी मागणी होत असतांनाही दखल घेतली जात नाही. येथील आमदारांची भुमिकादेखील स्पष्ट नसल्याने हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या माजलगावकरांनी आज सकाळी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. माजीमंत्री प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, राजेंद्र होके आदि नेत्यांनीही रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग नोंदवला.
माजलगाव शहरातून जाणार्या खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची रुंदी १०० फुटाची असतांनाही संबंधित काम घेतलेल्या कंपनीने तो रस्ता ७० फुटाचा करण्याचा घाट घातला आहे. यासंदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासुन माजलगावकरांकडून रस्ता १०० फुटाचाच करावा अशी मागणी होत आहे. या प्रश्नावरुन येथील आमदारांची भुमिका देखील स्पष्ट होत नाही. १०० ऐवजी ७० फुटाचा रस्ता झाल्यास भविष्यात याठिकाणी वाहतुकीची कोंडी होवू शकते. त्यामुळे आजच यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. याच मागणीवरुन माजलगावकरांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत येथील शिवाजी चौकात आज सकाळी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी या प्रश्नावरुन बोंबा मारत निषेध नोंदवला. माजीमंत्री प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, राजेंद्र होके आदिंनी सहभाग नोंदवला होता. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
Add new comment