Add new comment

माजलगाव जवळ बसवर दगडफेक

माजलगाव,(प्रतिनिधी) :- बसच्या समोरील भागाच्या काचावर दगडफेक करून अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याची घटना दुपारी चिंचगव्हाण कॅनाल जवळ घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा येथून माजलगावकडे जाणारी बस क्र. एम.एच. २० डी.९६९८ ही बस आज दुपारी चिंचगव्हाण कॅनाल जवळून जात असताना एका तरुणाने बसवर दगडफेक केल्याने समोरील काचा फुटून १५ हजार रुपयांचे नुकसान केले. सदरील तरुणाने दगडफेक का केली याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नसून बस चालक उत्तम बन्सी गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विकास शिनगारे नामक तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. पवार हे करीत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.