माजलगाव

ट्रक-कमांडरचा अपघात; एक ठार, चौघे गंभीर केसापुरी कॅम्पजवळील घटना

माजलगाव, (प्रतिनिधी):- येथील केसापुरी कॅम्पजवळ असलेल्या सुवर्णा मंगल कार्यालयासमोर एका वाळूच्या ट्रकने प्रवासी वाहतुक करणार्‍या कमांडरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील वाळुसह मुद्देमाल चोरीला

माजलगाव : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोहरील म्हणातात की तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी हा मुद्देमाल विकला तर अधिकारी म्हणतात हा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दोघांच्या बोलण्यात तफावत आल्याने या चोरीचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असले तरी पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरीला जाणे ही सुद्धा एक धक्कादायक बाब आहे.

मंत्रालयासमोर वृध्द महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना.आज काही वेळापूर्वी सखूबाई विठ्ठल झाल्टे ( ६५ ) या नाशिक जिल्ह्यातील चांदवड या गावच्या वृध्द महिलेने मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या वृध्द महिलेला पोलीसांनी तात्काळ सेंट जाॅर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या वृध्द महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

माजलगावात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते गव्हू व तांदूळ पकडला 

माजलगाव : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी कारवाई करत पकडला. ही कारवाई पवारवाडी फाट्यावर झाली असून या प्रकरणी  ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

माजलगाव तालुक्यात चौदा हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफी अर्जात ञुटी

माजलगाव -: राज्यात राबवण्यात येत असलेल्या छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने आंतर्गत माजलगाव तालुक्यात 71 हजार 635 शेतकर्‍यांनी आँनलाईन अर्ज भरले होते. त्यातील 13 हजार 902 शेतकर्‍यांच्या अर्जात ञुटी आढळून आल्या आहेत.

माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर

माजलगाव  : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

पंचवीस गावांच्या रस्त्यासाठी माजी मंत्री सोळंके यांचे उपोषण

 माजलगाव-प्रतीनिधी

मतदारसंघातील पातृड, लवुळ, परडी माटेगाव या रखडलेल्या रस्त्यांमुळे परिसरातील पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे. या रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करावे यासाठी पंचवीस गावातील ग्रामस्थांसह माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी बुधवारी उपोषण सुरू केले आहे. रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

माजलगाव येथे दोन लाख रुपयांचा गुटखा पकडला

माजलगाव

बीडमधील माजलगाव शहरातील झेंडा चौक भागातील अनेक कारनाम्याने चर्चेत असलेल्या कुशल लोढा याचे घरी सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी छापा टाकून गोवा-आरएमडी गुटख्याचा किमान दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

लोणगांव येथील स्मशानभूमीवर जि.प.शाळा व संबंधित शेतकर्‍यांचे अरिक्रमण ; एमअायएम.च्या कार्यकर्त्यांचे निवेदन .

माजलगांव दि.३१(प्रतिनिधि)तालुक्यांतील लोणगांव येथील स्मशानभूमीवर जि.प.शाळा व संबधित शेतकर्‍यांनी केले अतिक्रमण याकडे अधिकार्‍यांनी केलि डोळेझाक,अशी म्हणन्याचि वेळ आलि अाहे.तर ग्रामसेविकेने याबाबत कोणतिहि ठोस कार्यवाही केलि नाही .उलट तक्रारकर्त्यांला आरेराविचि भाषा करुन अकलेचे तारे तोडले आहेत. याबाबत एम.अाय.एम.चे कार्येकर्ते आन्साराम आलाट यांनी आज दि.३१ रोजी निवेदन देउन स्मशानभूमी भुमिचा प्रश्न लवकर सोडविण्यात यावे, अशी मागणी केलि आहे.

Pages