ऊसाच्या पैश्यासाठी जयमहेश कारखान्यावर शिवसेनेचे 10 मार्चला धरणे आंदोलन
*◾*
माजलगाव,दि.6(प्रतिनिधी): जय महेश कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे माहे डिसेंबर पासुन ते आजपर्यंत गाळप केलेल्या 110 कोटी रुपये शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे थकविले आहेत ते शेतकर्यांना तात्काळ द्यावे.अन्यथा शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख सुधिर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली 10 मार्च रोजी शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थित भव्य धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने आप्पासाहेब जाधव व शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी वाय.आर.कदम यांच्याकडे यांना दिला आहे.
जय महेश कारखान्याने दि.1 नोव्हेंबर 2017 पासून शेतकर्यांच्या ऊसाचे गाळप करत आहे.मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानूसार 15 दिवसात गाळप केल्यानंतर गाळपाची रक्कम अदा करणे बंधनकारक आहे.कारखाना सुरू होवून चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला असतांना केवळ महिन्याभरातील गाळपाचे पैसे शेतकर्यांना अदा केले असून उर्वरीत तीन महिण्याचे गाळप केलेल्या शेतकर्यांचे पैसे तात्काळ अदा करून शेतकर्यांची आर्थिक अडवणूक थांबवून.दि.10 मार्च 2018 पर्यंत गाळप करण्यात आलेल्या ऊसाचे रक्कम अदा करावी, अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली जय महेश कारखान्या विरोधात शिवसेनेच्या वतीने हजारो शेतकर्यांसह भव्य धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, युवासेना तालुका अधिकारी अॅड.दत्ता रांजवण,तुकाराम येवले यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकार वाय.आर.कदम यांच्याकडे यांना दिसला आहे.यावेळी सय्यद रहिम,सय्यद फारुक,टिपु सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष तौफीक कादरी,शेख इमरान,शेख अख्तर,सय्यद एजाज आदींची उपस्थिती होती.
Add new comment