माजलगाव

सुनेला आत्महत्यतेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन सासू पार्वतीबाई वारे हिची निदोष मुकतता

माजलगाव ( प्रतिनिधी ) वडवणी येथिल सोनाली संतोष वारे हिला वेगळे राहाणेचे कारणावरून ञास देवुन तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन सासू पार्वतीबाई वारे हिची माजलगांव येथील मा.अतिरिक्त सञ न्यायाधिश वाघमारे साहेब यांनी निदोष मुकतता केली.

जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

माजलगाव (प्रतिनीधी) शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठी, हा सवाल करत या सप्ताहावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची माहिती पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.  

पंतप्रधानांच्या उडान योजनेअंतर्गत जवाहरची गगनभरारी​

माजलगाव(वार्ताहर ) केसापुरी कॅम्प येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यावर्षीची शैक्षणिक सहल १९ ते २१ जानेवारी २०१८ या कालावधीत संपन्न झाली. सर्व सामान्यांना विमान प्रवास करता यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये प्रारंभ केलेल्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या जवाहर विद्यालयाच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेऊन आकाशातून पृथ्वीचे निरीक्षण केले. तसेच या सहलीतून पर्यावरण रक्षण व स्वछतेचा संदेश दिला.

कृष्णाई अर्बनचा उदघाटन सोहळा संपन्न

माजलगाव
येथील नव्यानेच सुरू झालेल्या कृष्णाई अर्बनचा उदघाटन सोहळा 26 जाने. प्रजासत्ताक दिनी मोठ्या थाटात व हर्षोल्हासात मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
हनुमान चौक येथे कृष्णाई अर्बनच्या उदघाटनास उदघाटक म्हणून माजी महसूल मंत्री मा. प्रकाश सोळंके हे होते तर अध्यक्ष म्हणून आमदार मा.आर.टी. देशमुख व प्रमुख पाहुणे सौ.सुरेखा लवांदे,सिईओ म.रा.पत.फेडरेशन पुणे, मा.आ. राधाकृष्णजी होके पाटील, मा. आ.डि.के.देशमुख, मोहन जगताप,बाबुराव पोटभरे,दयानंद स्वामी, विजय साळवे, सहाल चाऊस, अशोक डक,धम्मानंद साळवे, जयदत्त नरवडे हे उपस्थीत होते.

एसपी पथकाची सात ठिकाणी मटका बुक्कीवर धाड.ा

माजलगाव (प्रतिनीधी) -माजलगाव तालुक्यात शहर व ग्रामीण हद्दीत पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने अाज दुपारी सात ठिकाणी मटका बुक्कीवर धाडी टाकल्या या कारवाईत.सात अारोपी ताब्यात घेतले अाले असुन त्यांच्या कडुन मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे

पोलीस अधिक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पिएसअाय कैलास लहाने व त्यांच्या टिमने.अाज दुपारी शहर व ग्रामीण हद्दीत सात ठिकाणी मटका बुक्कीवर धाड मारुन सात जन ताब्यात घेतले असुन त्यांच्या कडील एकुण मुद्देमाल ११०२० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात अाला

माजलगावात,अाधार केंद्रावर काॅडनेटरची धाड ;अनमोल मल्टीसर्विसला सिल

माजलगाव (वाजेद पठाण) - माजलगाव शहरातील कोर्टरोडवरील न.प गाळे तिल अनमोल मल्टीसर्वीसेस आधार अनाधिकृत रित्या सुरू असल्याची माहिती मिळाली  जिल्हा काॅडनेटर यांनी तात्काळ त्या ठिकाणी काल दुपारी धाड टाकली या कारवाईत 

Pages