सुनेला आत्महत्यतेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन सासू पार्वतीबाई वारे हिची निदोष मुकतता
माजलगाव ( प्रतिनिधी ) वडवणी येथिल सोनाली संतोष वारे हिला वेगळे राहाणेचे कारणावरून ञास देवुन तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन सासू पार्वतीबाई वारे हिची माजलगांव येथील मा.अतिरिक्त सञ न्यायाधिश वाघमारे साहेब यांनी निदोष मुकतता केली.
याबाबतच्या घटनेची हकीगत अशी की ,बोरी ता.जिंतुर जि.परभणी येथील सरस्वतीबाई भ्र .किसनराव थोरात यांची मुलगी सोनाली हिचा विवाह वडवणी येथील संतोष डिगांबर वारे यांचे बरोबर सात वर्षांपुवी झाला होता .तिला त्याचे पासुन सार्थक व स समर्थ असे दोन मुले झाली आहेत .सोनाली हिची सासू पार्वतीबाई डिगांबर वारे हि सुनेला आमच्यात. राहू नका ,आमचे पासून वेगळे राहा ,आमचे घरातून बाहेर व्हा या कारणावरून सतत वाद घालीत होती .सासूच्या सततच्या ञासाला कंटाळून सोनाली हिने दि.16/12/2015 रोजी सायंकाळी 6.30 वा चे दरम्यान रहाते घरात प्लॅस्टीकचीकॅन मधील दोन लिटर राॅकेल स्वता:चे अंगावर ओतुन घेवून काडी लावुन स्वत: पेटवुन घेतले .त्यामध्ये ती 100% जळाली होती. घराशेजारचे मुरलीधर व वरवटे आणि इतर लोकांनी व गणेश भागवत यांनी तीचे अंगावर चादर टाकून विझवले .त्यानंतर तीला तिच्या पतीने उपचारासाठी अॅम्र्बुलंस मध्ये बीड येथील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
सोनाली हिचेवर लाईफलाईन हॉस्पिटल बीड मध्ये उपचार चालु असतांना दि16/12/2015 रोजी राञी बीड शहर पोलीस रटेशनचे जमादार मुंजाबा सैंदरमल व काय॓कारी दंडाधिकारी बीड श्री विलास तेलंग यांनी डाॅ .घनघाव याचे समक्ष तिचे मूत्युपुव॔ जवाब नोंदवले .त्यामध्ये तीने तीचे सासुचे ञासाला कंटाळूना स्वत:अंगावर राॅकेल ओतुन पेटवुन घेतल्यामुळे ती जळाली असल्याचे सांगितली .त्यानंतर सोनाली ही उपचाराचे दरम्यान दि .17/12/2015 रोजी दवाखान्यात मरण पावली
सोनाली वारे हिने दिलेल्या मूर्तयुपुव॔ जबाबावरून तिची सासू पार्वती बाई डिंगाबर वारे हिचे विरूद्ध वडवणी पो.रटे . कलम 498अ , 306 भा.दं.वि .अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री रूपेकर यांनी करून पार्वती बाई वारे हिचे विरूद्ध वडवणी येथील न्यायालयात आरोपपञ दाखल केले. वडवणी न्यायालयाने ते प्रकरण माजलगाव येथील अतिरिक्त सञ न्यायालयात वर्ग केले.
सदर प्रकरणाची सुनावणी माजलगाव येथील अतिरिक्त सञ न्या यालयात झाली सरकार पक्षाचे वतीने एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले.दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण सरकार पक्षाने आरोपी विरूद्ध निविवादपणे आरोप सिद्ध न केल्या मुळे मा.वाघमारे साहेब ,अतिरिक्त सञ न्यायाधिश माजलगाव यांनी पार्वती बाई वारे हिची सर्व आरोपातुन निर्दोष मुक्त ता केली.
आरोपीच्या वतीने माजलगाव येथील विधिज्ञ अॅड.व्ही .बी.लवटे यांनी काम पाहिले .त्याना अॅड लहू गवते यानी सहकार्य केले.
Add new comment