कृष्णाई अर्बनचा उदघाटन सोहळा संपन्न

माजलगाव
येथील नव्यानेच सुरू झालेल्या कृष्णाई अर्बनचा उदघाटन सोहळा 26 जाने. प्रजासत्ताक दिनी मोठ्या थाटात व हर्षोल्हासात मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
हनुमान चौक येथे कृष्णाई अर्बनच्या उदघाटनास उदघाटक म्हणून माजी महसूल मंत्री मा. प्रकाश सोळंके हे होते तर अध्यक्ष म्हणून आमदार मा.आर.टी. देशमुख व प्रमुख पाहुणे सौ.सुरेखा लवांदे,सिईओ म.रा.पत.फेडरेशन पुणे, मा.आ. राधाकृष्णजी होके पाटील, मा. आ.डि.के.देशमुख, मोहन जगताप,बाबुराव पोटभरे,दयानंद स्वामी, विजय साळवे, सहाल चाऊस, अशोक डक,धम्मानंद साळवे, जयदत्त नरवडे हे उपस्थीत होते.
याप्रसंगी माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके म्हणाले की, कृष्णाई अर्बनही बँक सर्वसामान्यांना व छोटया छोट्या व्यवसायिकांची पत निर्माण करण्याचं काम करील बँकेचे संस्थापक राहूल विठ्ठलराव टाकणखार सर,यांच्या शैक्षणिक, आर्थिक, व सहकार क्षेत्रातील अनुभव कामी येईल. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आर.टी. देशमुख यांनी माजलगाव तालूका सुपीक व सधन असल्याने येथे सहकार क्षेत्राला भरपूर वाव आहे कृष्णाई अर्बन ही येथील बेरोजगार, सर्वसामान्य माहिला उद्योगाला व व्यावसायीकांना आर्थिक मदत करुन भरभराटीस जाईल सुरेखा लंवादे यांनी सांगितले की, सहकारात पारदर्शकता व विश्वासार्हता ठेवल्यास अर्बनला उज्ज्वल भविष्य आहे.याप्रसंगी विजयकुमार आलझेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळ्यास,नितीन नाईकनवरे, कचरू खळगे,अविनाश जावळे, पंकज जावळे, शरद चव्हाण, श्रीहरी मोरे, मुरली साळवे, मिलिंद लगाडे, ज्ञानेश्वर मेंडके, भिमकराव हाडूळे, अप्पासाहेब जाधव,डॉ.अरूण मुंडे, दिपक टाकणखार, हनुमान कदम,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,कृष्णाई अर्बनच्या अध्यक्षा,आयु.प्रियंका राहूल टाकणखार,उपाध्यक्ष कल्याण गवते,सचीव डॉ. सचीन देशमुख, अॅड.अखील घाडगे, अॅड. संजय राठोड,आयु. सुजाता भारत टाकणखार, आयु.मनिषा प्रकाश तोडके, दत्ता महाजन, सलीम इनामदार, अॅड.अमर रांजवण, नय्युम पठाण व मुख्य काडाजर्यकारी अधिकारी चेतन टाकणखार व सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले