लोणगांव येथील स्मशानभूमीवर जि.प.शाळा व संबंधित शेतकर्यांचे अरिक्रमण ; एमअायएम.च्या कार्यकर्त्यांचे निवेदन .
माजलगांव दि.३१(प्रतिनिधि)तालुक्यांतील लोणगांव येथील स्मशानभूमीवर जि.प.शाळा व संबधित शेतकर्यांनी केले अतिक्रमण याकडे अधिकार्यांनी केलि डोळेझाक,अशी म्हणन्याचि वेळ आलि अाहे.तर ग्रामसेविकेने याबाबत कोणतिहि ठोस कार्यवाही केलि नाही .उलट तक्रारकर्त्यांला आरेराविचि भाषा करुन अकलेचे तारे तोडले आहेत. याबाबत एम.अाय.एम.चे कार्येकर्ते आन्साराम आलाट यांनी आज दि.३१ रोजी निवेदन देउन स्मशानभूमी भुमिचा प्रश्न लवकर सोडविण्यात यावे, अशी मागणी केलि आहे.
स्मशानभूमीवर अतिक्रमण करुनही याकडे ग्रामसेविका दळवी आर.के.या मुद्दामहून डोळेझाक करत आहेत. संबधितांवर कोणतिहि कार्यवाहि केलि नाही.सदरिल अतिक्रमण केलेल्या स्मशानभूमी ह्या मराठा,बौद्ध व मातंग समाजातील आहेत.याच ठिकाणी जि.प.शाळा चालु आहे. तसेच काही शेतकर्यांनी या जमिनिवर अतिक्रमण केले आहे. या अगोदर या स्मशानभूमीमध्ये प्रेतांची दोन ते सांगाडे मिळाले होते. असे असताना प्रशासनाला या बाबतचे कोणतेही गांभीर्य नाही.म्हणुन एम.अाय.एम.चे कार्यकर्ते अन्साराम आलाट यांनी आज दि.३१ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे हि मागणी केलि आहे. या सार्वजनिक ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी केलि आहे .
Add new comment