पंचवीस गावांच्या रस्त्यासाठी माजी मंत्री सोळंके यांचे उपोषण
माजलगाव-प्रतीनिधी
मतदारसंघातील पातृड, लवुळ, परडी माटेगाव या रखडलेल्या रस्त्यांमुळे परिसरातील पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे. या रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करावे यासाठी पंचवीस गावातील ग्रामस्थांसह माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी बुधवारी उपोषण सुरू केले आहे. रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील ग्रीन बेल्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या लवूळ येथून पातृड व त्या अलीकडे परडी माटेगाव या मार्गावर पंचवीस गावांचा संपर्क व दळणवळण आहे. त्यावर एका शेतकऱ्याने योग्य भाव मिळावा याकरीता हा रस्ता काही वर्षांपूर्वी उखडून टाकला, त्यामुळे या परिसरातील लोक कसातरी मार्ग काढून ये-जा करत असत. आता पुन्हा हा रस्ता खोदून ठेवल्याने या भागात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे कसरत करत लोकांना प्रवास करावा लागत असल्याने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यासाठी उपोषण सुरू आहे, सोळंके यांचे समवेत जयदत्त नरवडे, उपसभापती नीलकंठ भोसले, भारत जगताप, सचिन लंगडे, दिनेश मस्के, बाळासाहेब शिंदे, अॅड्. बंडू डक, अॅड्. विनायक लवटे, दीपक जाधव, कचरू खळगे यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
Add new comment