माजलगाव येथे दोन लाख रुपयांचा गुटखा पकडला

माजलगाव

बीडमधील माजलगाव शहरातील झेंडा चौक भागातील अनेक कारनाम्याने चर्चेत असलेल्या कुशल लोढा याचे घरी सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी छापा टाकून गोवा-आरएमडी गुटख्याचा किमान दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

शहरात गोवा व आरएमडी गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याने त्याची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी खबऱ्या मार्फत माहिती घेऊन रात्री आठ वाजता कुशल लोढा याच्या तीन मजली घरावर छापा टाकला. या घरात तपासणी केली असता गुटख्याचा किमान दहा बॅग, दोन बॉक्स असा ऐवज मिळून आला. यावेळी पोलिसांनी पवन लोढा यास ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्याने तेथे मोठी गर्दी झाली होती. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.