लाइव न्यूज़
दोन दिवसापूर्वी पकडलेला दिड लाखाचा गुटखा अजुनही मालकाच्याच घरी!
Beed Citizen | Updated: February 15, 2018 - 3:09pm
माजलगाव पोलिसात हद्दवाद; अन्न, औषध प्रशासनही दखल घेईना
माजलगाव (प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून दिड लाखाचा गुटखा पकडला. कारवाईनंतर हद्द शहर पोलिसांची असल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधीतांना कळविले. आपल्या हद्दीत ग्रामीण पोलिसांनी कारवाई केल्याने ‘ईगो’ दुखावलेल्या शहर पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करत अन्न औषध प्रशासनाला माहिती दिली. आधीच पोलिसांमध्ये जुंपलेला हद्दवाद आणि अन्न, औषध प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दोन दिवसापूर्वी पकडलेला दिड लाखाचा गुटखा अजुनही मालकाच्याच घरी पडून असल्याने चर्चेला उधान आली आहे. या प्रकरणात काही काळंपांढरं तर होत नाही ना? अशी शंकाही अनेकांकडून व्यक्त होत आहे.
माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शहरातील एका भागामध्ये छापा टाकून दिड लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. कारवाईनंतर तो भाग शहर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शहर ठाण्याला कळविले. शहर ठाण्याच्या पोलिसांनी एका बोटचा थुक्का दुसर्या बोटावर लावत अन्न औषध प्रशासनाला विभागाला कळवत कारवाईकडे दुर्लक्ष केले. अन्न औषध प्रशासनेही त्याची काहीच दखल घेतली नाही. परिणामी कारवाईत पकडलेला दिड लाखाचा गुटखा अजूनही मालकाच्याच घरी असल्याने उलटसूलट चर्चेला उधान आले आहे. झेंडा चौकात एका गुटखा माफियावर कारवाई होते. मग या प्रकरणातच वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
Add new comment