मंत्रालयासमोर वृध्द महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालयातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना.आज काही वेळापूर्वी सखूबाई विठ्ठल झाल्टे ( ६५ ) या नाशिक जिल्ह्यातील चांदवड या गावच्या वृध्द महिलेने मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या वृध्द महिलेला पोलीसांनी तात्काळ सेंट जाॅर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या वृध्द महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
सखूबाई विठ्ठल झाल्टे या नाशिक जिल्ह्यातील चांदवड या गावच्या ६५ वर्षीय वृध्द महिलेने आज मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वृध्द महिलेला सेंट जाॅर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.या वृध्द महिलेसोबत २२ वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत होता. तो पुण्यात कृषी सेवक म्हणून नोकरीस आहे. सखूबाई झाल्टे यांचा आणि भाऊबंदकी यांच्यात जमीनीचा वाद उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दाद मागितली होती पण हताश झालेल्या या वृध्द महिलेने आज विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या वृध्द महिला आपल्या मुला सोबत आज कामासाठी मंत्रालयात आली होती. मात्र मंत्रालयातून बाहेर पडताच तिने आपल्या जवळ असलेल्या एका बाटलीत असलेले विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्रालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांनी आणि बाहेरील काही नागरीकांनी त्या महिलेला तातडीने टँक्सीत घालून सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सदर महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
Add new comment