Add new comment

महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच विवाहितेला पेटविले

घरातील मंडळी कडी लावून पसार; महिला ९५ टक्के भाजली; मृत्यूशी झुंज
बीड, (प्रतिनिधी):- महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच एका २८ वर्षीय विवाहितेस सासरच्या लोकांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना (चिंचगव्हाण ता.माजलगाव) येथे आज सकाळी घडली. सदर विवाहिता ९५ टक्के भाजली असुन जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील राधिका गजानन गोरकर (वय २८) या विवाहितेस आज सकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. घरातील मंडळी दाराची कडी लावून पसार झाले. शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून तिला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राधिका गोरकर या ९५ टक्के भाजल्या आहेत. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९५ टक्के भाजल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सासरच्या लोकांनी पहाटे ४ वाजता तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच महिला अत्याचाराची दुर्दैवी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.