Add new comment

माजलगावजवळ जिनिंगला आग; टेम्पोसह कापूस खाक

माजलगाव, (प्रतिनिधी):- शहरापासुन जवळच असलेल्या गढी रोडवरील मनकॉट जिनिंगला आज सकाळी आग लागली. भिषण आगीत टेम्पोसह कापूस जळून खाक झाल्याने अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी उशिरा आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले.
माजलगावजवळील गढी रोडवर असलेल्या मनकॉट जिनिंगला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कापसाच्या गठाणी असल्याने काही क्षणातच आग जिनिंगच्या परिसरात पसरली. कापूस घेऊन आलेला टेम्पोनेही पेट घेतला. जिनिंगवरील कापसाचे ढिगारे आणि टेम्पो जळून खाक झाला असुन घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनास्थळी बंबासह दाखल झालेल्या महेंद्र टाकणखार, समीर शेख, निशिकांत टाकणखार, विजय पौळ, अनिल खडगळे, दत्ता सावंत, सतिष क्षीरसागर, किशोर टाकणखार, अनिल भिसे आदिंनी आग आटोक्यात आणली. सदरील आगीमध्ये टेम्पोसह कापसाच्या गठाणी जळून अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.