बीड जिल्ह्याने आणखी एक नेता अपघातात गमावला

बीड जिल्ह्याने आणखी एक नेता 
अपघातात गमावला 

माजी आ. आर. टी. देशमुख यांचे अपघाती निधन 

माजलगाव मतदारसंघावर शोककळा 

माजलगाव ( प्रतिनिधी ) माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख ( जिजा ) यांच्या गाडीला लातूर - औसा रोडवर आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आर. टी. देशमुख यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषदेचे सदस्य, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि माजलगावचे आमदार अशा विविध पदांवर काम करणाऱ्या जिजा यांच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान बीड जिल्ह्याने जिजा यांच्या रूपाने  आणखी एक मोठा नेता अपघातात गमावला आहे. आधी दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यानंतर आ. विनायकरावजी मेटे साहेब आणि आता आर. टी. जिजा साहेब.
 
आमदार आर. टी. देशमुख यांचे आज सोमवार, दिनांक २६ मे रोजी दुर्दैवी अपघातात निधन झाले. हा अपघात लातूर जिल्ह्यातील लातूर-औसा रस्त्यावरील बेलकुंडी गावाजवळ दुपारी घडला. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे त्यांच्या एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. बेलकुंडीजवळ त्यांच्या वाहनाचं चालकावरून नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. त्यां सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माजी आ. आर.टी.देशमुख यांना सिटीझन परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.