भगरीच्या पिठातून चार गावातील नागरिकांना विषबाधा

 

ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु

------------------------------------

माजलगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : एकादशीच्या उपवासासाठी खालेल्या भगरीच्या पिठामुळे उमरी, रोषणपुरी, कोथरूळ येथील अनेकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दि. १७ दुपारी घडली. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात जवळपास ८० महिला, पुरुष रुग्णांवर उपचार सुरु असून यातील काही अत्यावस्थ रुग्णांना बीडच्या रुग्नालयात पाठविण्यात आले आहे.

पौष महिन्यातील आज एकादशी असल्याने ग्रामीणभागात अनेकजन हा उपवास धरतात. गुरुवारी दि. १७ उमरी, रोषणपुरी, कोथरूळ, छत्र बोरगाव येथील नागरिकांनी एकादशीच्या उपवासाच्या फराळासाठी गावातील किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले. दोन दिवसापूर्वी एका खाजगी व्यक्तीकडून दुकानदारांनी भगरीचे पीठ विकत खरेदी केल्याचे सांगण्यात आले. हेच पीठ गुरुवारी गावातील नागरिकांना विकले. फारासाठी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या पण दुपारनंतर उमरी गावातील चार, पाच जणांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने काहीजण शहरातील खाजगी रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर असा त्रास होणारांची संख्या ईतर गावातूनही वाढत गेली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उमरी, रोषणपुरी, कोथरुळ येथील जवळपास ८० रुग्ण दाखल झाले. यात ६० ते ६५ महिला रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करण्यात येत असून अत्यावस्थ रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जागा अपुरी पडत असल्याने रुग्णालयातील एका खाटावर दोन रुग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णावर उपचार केले. यात डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, डॉ. दत्तात्रय पारगावकर, डॉ. आनंद उघडे, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रसाद कुलकर्णी सहभाग होता.

 -------------------------------------

यातील काही अत्यावस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले असून येथील रुग्णांची परस्थिती स्थिर आहे.

डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.