सिंधफनानदी वरील जुन्या पुलाचे कटडे चोरणारे जेरबंद आयडिया चे केबल बंद वरुन उघड झाला प्रकार

‌माजलगाव दि.१७ ( प्रतिनिधी ) शहरा लगत आसलेल्या सिंधफना नदी च्या जुन्या पुलाचा वापर नसल्याचा गैर फायदा घेत पुलावरील लोखंडी कटडे व  आयडिया कंपणी च्या केबलला लावलेल्या पाईप कापुन केबल चोरी केल्या वरुन अज्ञात  चोरट्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‌या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात माजलगाव शहरातील जुजगर गल्ली भागात  दोघांना ताब्यात घेतले आहे. 
      माजलगाव शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्ग २२२ मुळे सिंधफनानदी वर मोठा पुल झाल्याने जुना पुल कालबाह्य झाल्यानेच या पुलावरील वाहातुक बंद पडल्याने कालबाह्य झालेल्या पुलावर कोणाचेच लक्ष नसल्याने या ठिकाणी आसलेल्या लोखंडी अॕगल सह सरक्षणासाठी आसलेल्या लोखंडी पाईप चोरट्यानी चोरुन नेवुन नेल्याचा प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नसल्याने  पुन्हा दुसऱ्या बाजुला आसलेले कटडे काढत आसतांना याच पुलावरुन आयडिया कंपणीचे नेटवर्कचे केबल पाईपा मधुन  गेले होते.
   चोरट्यांनी या केबालसाठी आवरण म्हणुन आसलेल्या लोखंडी पाईप  करवतीने कापुन घेऊन गेले यात केबल कनेक्शन लाईन बंद पडल्याने  आयडिया कंपणीचे  विठ्ठल कदम  यांनी केबल चेक करत आसतांना सदरील केबल सिंधफनानदीवरील जुन्या पुलावर केबल तुटुन पडले आसुन पाईप कापुन नेल्याचा प्रकार उघड झाला. या वरुन माजलगाव शहर पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात माजलगाव शहरातील जुजगर गल्ली भागात राहणारे अंबादास  ढवळे ,अशोक बाबर यांना आटक करण्यात आली आसुन पुढील तपास दिलिप सरवदे हे करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.