परळी (प्रतिनीधी) येथील कामगार कल्याण केंद्रात ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस वीरभद्रेशवर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर गिरवलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी कार्यालयातील उल्हास भारती, केंद्र संचालक आरेफ शेख, चाटे शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता गोरे, भानुदास चव्हाण उपस्थित होते.