लाइव न्यूज़
Add new comment
परळी येथे कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण

परळी (प्रतिनीधी) येथील कामगार कल्याण केंद्रात ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस वीरभद्रेशवर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर गिरवलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी कार्यालयातील उल्हास भारती, केंद्र संचालक आरेफ शेख, चाटे शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता गोरे, भानुदास चव्हाण उपस्थित होते.
यावेळी लहान बालकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे सादर केली. उमा ताटे, भगवान मंडलीक, मसरत खान, माधवी कराड, मनिषा काळे, गिरीष जाधव, शिवबस खराडे, गंगाधर कांबळे, मिना भोईनवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.