परळी

परळीत भुश्याच्या पोत्यात गुटखा विशेष पथकाने पकडला ३० लाखांचा मुद्देमाल

परळी, (प्रतिनिधी):- नियमित परळी- पूजे मार्गावर धावणार्‍या टेम्पोमध्ये आज गुटखा असल्याची माहिती पोलिसांना कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ४० पोटे गुटखा पकडण्यात यश आले आहे. मंगळवारी पहाटे टेम्पो क्र. एम.एच.२५ यू १०४९ हा लृहून पुणेकडे मार्गस्थ होत होता. परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत टोकवाडी कडून परळीकडे येत असतांना या टेम्पोमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरूनच अंदाजित तीस लाख रूपयांचा व ४० पोते या सहा टायर आयशर टॅम्पो मध्ये गुटखा पकडला आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केली आहे.

परळीत हॉटेलमध्ये प्राध्यापकाच्या आत्महत्येने खळबळ

परळी- प्रतिनिधी
—————————————
परळी शहरातील रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये एका ४१ वर्षीय प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. अनिलकुमार होळंबे असे प्राध्यापकाचे नाव आहे.

’परळी विधानसभा निवडणूक शिवसेना लढणार’

परळी (प्रतिनीधी)
परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मातोश्रीवरुन हाच संदेश घेऊन मी आलो असल्याची घोषणा शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी केली. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता.

बीड जिल्हा विभाजनाचा प्रश्न जटील ! अंबाजोगाईनंतर परळीतुनही जिल्हा निर्मितीची मागणी परळी जिल्हा निर्मितीसाठी भाजप कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन 

बीड ( प्रतिनिधी ) जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावरून आता अंबाजोगाई आणि परळीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीला जोर आलेला असतानाच आता परळी वैजनाथ जिल्हा म्हणून घोषित करा अशा मागणीचे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी आज तेथील तहसिलदारांना दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासाठी परळीच योग्य असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाला वेग आलेला असतानाच परळीकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विभाजनाचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे.

रेल्वे रुळावर महिलेचा मृत्यू ; पोलीसाकडुन ओळख पटविण्याचे अहवान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. १३ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याचे आढळून आले. सदर प्रेत सरकारी दवाखाना येथे ठेवण्यात आलेले आहे. महिलेच्या पायाला कोड फुटलेले दिसत असून वय अंदाजे ४० वर्षे असून चेहरा अपघातात नष्ट झालेला आहे. तरी कोणाच्या घरी महिला बेपत्ता असेल त्यांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची पोलीस ठाण्यात नोंद केली आहे, अधिक माहितीसाठी तपासी अंमलदार राठोड (मो.नं. ८८८८१९६७८८) यांच्याशी संपर्क साधावा.

सत्ता असो किंवा नसो मी सदैव अपंगाच्या पाठीशी-ना.धनंजय मुंडे ; मराठवाड्यातील पहिल्या अपंग भवनाचे परळीत भुमीपुजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
सत्ता असो किंवा नसो मी सदैव अपंगाच्या पाठीशी असुन त्यांच्या अडचणी सोडविण्यास कटिबध्द आहे. असे सांगत अपंगाच्या प्रश्‍नासाठी डॉ.संतोष मुंडे करित असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज केले. 

बुथ यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागा - खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

भाजपच्या बुथ प्रमुखांचे प्रशिक्षण शिबीर परळीत संपन्न
——————————————————————————
ना. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मोठे; राज्यात प्रचारासाठी त्यांना मोकळा वेळ द्या
——————————————————————————

Pages