सत्ता असो किंवा नसो मी सदैव अपंगाच्या पाठीशी-ना.धनंजय मुंडे ; मराठवाड्यातील पहिल्या अपंग भवनाचे परळीत भुमीपुजन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
सत्ता असो किंवा नसो मी सदैव अपंगाच्या पाठीशी असुन त्यांच्या अडचणी सोडविण्यास कटिबध्द आहे. असे सांगत अपंगाच्या प्रश्नासाठी डॉ.संतोष मुंडे करित असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज केले.
परळी नगर परिषदेच्या वतीने मराठवाड्यातील पहिले अपंग भवन व पेन्शन भवन उभारण्यात येणार असुन या इमारतीचा भुमीपुजन समारंभ आज ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य अजय मुंडे, रा.कॉं.पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, मुख्याधिकारी डॉ.बी.डी.बिक्कड साहेब, उपनगराध्यक्ष आयुब खॉ पठाण, गोपाळ आंधळे, प्रा.डॉ.मधुकर आघाव, सुर्यभान(नाना) मुंडे विजय भोयटे, संजय फड, अनिल आष्टेकर, अन्नपुर्णाताई जाधव, वैशालताई तिडके, पल्लवीताई भोयटे, रामेश्वरजी देशमुख, गणेश देशमुख अंबाजोगाई, संतोष शिंदे, के.डी.उपाडे, सुरेश फड, ऍड.श्रीनिवास मुंडे, ऍड.प्रकाश मुंडे, बाळु लड्डा, वसंत तिडके, महेंद्र रोडे, कैलास तांदळै, रंगनाथ सावजी, गणेश मगर, रणजित सुगरे आनंत इंगळे, रामदास कराड, नंदकुमार मुंडे, किशोर केंद्रे, वैजनाथ बागवाले, शकील कच्छी, पिंटु सारडा, बाशीद भाई, प्रदिप खाडे व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलातंना धनंजय मुंडे म्हणाले की, अपंगांना न्याय मिळावा म्हणून मी नेहमी अग्रेही भुमीका घेतलेली आहे. अपंग बांधवांच्या समस्या माणुसकीच्या नात्याने सोडव्यात यासाठी मी शासन दरबारी नेहमी पाठपुरावा केलेला आहे. याच भावनेतुन परळीत पहिले अपंग भवन साकारत असुन यासाठी डॉ.संतोष मुंडे यांनी बरीच मेहनत घेतली आहे. अपंगांना न्याय मिळवुन देण्यासाठी ते सतत संघर्ष करीत असतात. त्यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याच प्रमाणे पेन्शनर्सचेही प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. असे सांगुन तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मला सत्तेची गरज नाही सत्ता असो किंवा नसो तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ.संतोष मुंडे आपल्या भाषणात म्हणाले की, सरकार अपंगावर सतत अन्याय करीत आली आहे. मात्र ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वखाली मी ठिकठिकांणी संघर्ष करुन अपंगानां न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले. मला प्रत्येक ठिकाणी ना.धनंजय मुंडे यांनी समर्थ साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी उपेक्षितांसाठी संघर्ष करु शकलो. त्यामुळे अपंगाचे आणि पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्याचे श्रेय ना.धनंजय मुंडे यांना जाते. असे मत व्यक्त करुन परळीत पहिले भवन उभारल्या बद्दल त्यांनी ना.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी २०० अपंगाना ३% निधी वाटपाचा (पहिला टप्पा) वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचे स्वागत अपंगाचे कैवारी तथा रा.यु.कॉं.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले. अपंग भवनाचे भुमीपुजन राज्याचे विरोध पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. तसेच अपंगाचा ३% निधी (पहिला टप्पा) ही लाभार्थींना ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई सोमनाथाअप्पा हालगे या होत्या तर या कार्यक्रमास या कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील 2000 पेक्षा जास्त अपंग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड.मंजीत सुगरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रंजित रायभोळे, सय्यद सुभान, साजन लोहिया, शेख फेरोज, शेख कादर,अनंतराव लोखडे, अनंत बापु मुंडे, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, विरेंद्र रायभोळे, प्रदिप भोकरे, गौतम रायभोळे, इरफाना शेख, शेख मुबारक, शेख फुया, शेखा हारा, शेख मिरा, सरताज खान, उध्दव फड, दत्ता काढे, ममता लट्टर, सुधाकर फड, केशव फड, विमलचंद निलंगे, फुला पालेवाल, साहेबराव पवार, पुष्पा कांबळे, अनंत सौंदळे, दत्ता कराड, संभाजी गित्ते, गजानन मनाळे, पाटलोबा ढाकणे, वैजनाथ थोंडके, मयुर शिंदे, बाळासाहेब चव्हाण, शेख चॉंद यांनी परिश्रम घेतले.
Add new comment