साडीने गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या सिरसाळ्यातील प्रकार
सिरसाळा प्रतिनिधी : येथील विस वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे , योगेश रामभाऊ चव्हाण वय ( २० ) असे युवकाचे नाव आहे , हि घटना दिनांक १९ फेब्रुवारी रोजी च्या सायंकाळी झाली असल्याचे समजते आहे, फाशी घेतल्याचा प्रकार काल दिनांक २० रोजी उघडकिस आला आहे. सिरसाळा पोलिस यांनी घटनास्थळी कळता क्षणी तातडीने धाव घेतली व पंचनामा करुन प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी हलवले, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत योगेश चे नातेवाईक लक्ष्मण संभाजी कणसे रा. परळी वै. यांच्यानुसार सिरसाळा पोलिस स्टेशन येथे अज्ञात कारणावरुन आत्महत्येची सिआरपी १७४ भादवी नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढिल अधिक तपास पिएसआय जाधव करत आहेत. योगेश च्या वडिलांनी सुद्धा काही वर्षांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि आता त्यांचा मुलगा योगेश याने सुद्धा गळफास घेऊनच आत्महत्या केली, ह्या घटनेने सिरसाळा ग्रामस्थां मधून हळ हळ व्यक्त होत आहे.
नागरिकांमधून संशय व्यक्त : गळफास घेतलेला असतांना सुद्धा मयत योगेश चे घुढगे पलंगावरती टेकलेल्या अवस्थेत होते, दुसरे म्हणजे गळफाश रुम मधील वस्तू अस्थ वेस्थ पसरलेल्या अवस्थेत होत्या असे संबंधित घटनास्थळी पाहणी करणारे लोक बोलत असुन ह्या घटने बद्दल संशय व्यक्त देखील करत आहेत
Add new comment