वाहन चालकांच्या हक्कांसाठी लढणार - हनुमंत पवार

दिंद्रुड प्रतिनिधि 
परिवार वार्यावर सोडत दिवसरात्र वाहन चालवतांना कसलेही वैयक्तिक जिवन न जगता येणार्या वाहन चालकांच्या हक्कांसाठी त्यांच्या सुखदुखा:त सहभागी होण्यासाठी जय संघर्ष ग्रुप ची स्थापना झाली असल्याचे प्रतिपादन जय संघर्ष ग्रुप या संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी प्रतिपादन केले आहे.दिंद्रुड येथिल वाहन चालकांच्या बैठकीत ते बोलत होते. जनतेसाठी अहोरात्र पळणार्या वाहनचालकांकडे बघण्याची लोकांची दृष्टी या संघटने मुळे बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रभर या संघटनेचे वलय पसरत असुन संकटकाळात  एक फोन करा व तात्काळ मदत मिळवा हे संघटनेचे धोरण संघटना 
राष्ट्रीय अध्यक्ष संजय हाळणोर यांच्या मार्गदर्शनाने राबवत अाहे.दिंद्रुड व परिसरातील दिडशे ते दोनशे वाहन चालक या संघटनेचे सदस्य आहेत. 
 
बैठकीला जय संघर्ष ग्रुपचे मराठवाडा सचिव रमेश गित्ते परळी शहर अध्यक्ष प्रकाश मुंडे उपाध्यक्ष गोपाळ सातपुते, पत्रकार संतोष स्वामी, अमोल ठोंबरे उपस्थित होते. दिंद्रुड शाखेची कार्यकारिणी यावेळी जाहिर करण्यात आली.महेश चव्हाण दिंद्रुड शाखाध्यक्षपदी तर माऊली पांचाळ यांची उपाध्यक्ष पदी या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. 
हरिदास बडे,रवी कदम ,राहुल कदम, नितिन माने, सचिन गिराम,बाळु खाडे, गजानन मायकर, किरण फपाळ, राहुल साळुंके,गणेश पुरी आदी वाहन चालक उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.