परळीत भुश्याच्या पोत्यात गुटखा विशेष पथकाने पकडला ३० लाखांचा मुद्देमाल

परळी, (प्रतिनिधी):- नियमित परळी- पूजे मार्गावर धावणार्‍या टेम्पोमध्ये आज गुटखा असल्याची माहिती पोलिसांना कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ४० पोटे गुटखा पकडण्यात यश आले आहे. मंगळवारी पहाटे टेम्पो क्र. एम.एच.२५ यू १०४९ हा लृहून पुणेकडे मार्गस्थ होत होता. परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत टोकवाडी कडून परळीकडे येत असतांना या टेम्पोमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरूनच अंदाजित तीस लाख रूपयांचा व ४० पोते या सहा टायर आयशर टॅम्पो मध्ये गुटखा पकडला आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केली आहे. संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई अन्न व भेसळ अधिकारी यांचे पाचारण झाल्यावर होणार आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक नरहारी नागरगोजे, सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, सचिन सानप केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.