बुथ यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागा - खा. डाॅ. प्रितमताई मुंडे
भाजपच्या बुथ प्रमुखांचे प्रशिक्षण शिबीर परळीत संपन्न
——————————————————————————
ना. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मोठे; राज्यात प्रचारासाठी त्यांना मोकळा वेळ द्या
——————————————————————————
परळी ......... नेता आणि कार्यकर्ता हया एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, या दोन्ही बाजू भक्कम असल्याशिवाय संघटनात्मक ताकद दिसून येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघातील कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागावे असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी येथे केले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मोठे असून त्यांचा विजय निश्चित तर आहेच पण त्यांना मताधिक्य देण्याची जबाबदारी आपली आहे असे सांगत ना. पंकजाताई यांना प्रचाराकरिता राज्यभर फिरण्यासाठी मोकळा वेळ द्या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्य विस्तार योजने अंतर्गत परळी विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांचे प्रशिक्षण शिबीर खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज एन एच अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, पक्ष विस्तारक सुभाष धस, जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे,जीवराज ढाकणे, गौतमबापू नागरगोजे,महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगल किशोर लोहिया, शेख अब्दुल करीम, श्याम आपेट, भीमराव मुंडे, बालहक्क आयोगाच्या सदस्या डाॅ. शालिनी कराड आदी यावेळी उपस्थित होते.
पालक मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. जलसंधारण, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, ग्राम विकसाच्या योजना, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बीडच्या रेल्वेचा प्रश्नही आम्ही सोडवला आहे. असे असताना किरकोळ गोष्टी वरून नकारात्मक भाव न ठेवता कार्यकर्त्यांनी समाधानी वृतीने काम करावे. कधी कधी अपयश आल्यास आम्हीही नाउमेद होतो पण पुन्हा नव्याने कामाला लागतो. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले म्हणून आपल्याला हे दिवस पहायला मिळत आहेत असे त्या म्हणाल्या. मतदारसंघात चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यां विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही ज्यांना संपविण्यासाठी प्रयत्न करतोय त्यांना तुम्ही मोठे करण्याची चूक करू नका. भाजपच्या बाजूने वातावरण चांगले असल्याने आपल्या चांगल्या गोष्टी व केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत.
*बुथ यंत्रणा मजबूत करा*
---------------------------------
भाजपने आगामी निवडणुकीत वन बूथ २५ युथ अशी यंत्रणा राज्यभर सक्रीय केली आहे. मतदार संघातही कार्यकर्त्यांनी अशी बूथ यंत्रणा मजबूत करून सर्व ठिकाणी मतांची आघाडी घ्यावी असे सांगून त्यांनी कशा पद्धतीने काम करावे हे सांगितले. ना. पंकजाताई मुंडे हया मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करतील यात मुळीच शंका नाही परंतु त्याचे मताधिक्य वाढले पाहिजे त्या राज्याच्या नेत्या असल्यामुळे इतर ठिकाणीही त्यांना फिरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा मतदार संघात कमीत कमी वेळ घेवून त्यांना प्रचारासाठी राज्य भर फिरू द्यावे, अशा पद्धतीने काम कार्यकर्त्यांनी करावे व त्यासाठी त्यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले. शिबिरास बुथ यंत्रणेतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी दिल्या
वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा
--------------------------------
खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस येत्या १७ फेब्रुवारी रोजी आहे परंतु शिबारास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चार दिवस गोदरच त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केकही कापला तसेच पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.कार्यकर्त्याच्या या प्रेमामुळे खा. डॉ. प्रितमताई मुंडे भारावून गेल्या.
Add new comment