परळी

मराठवाड्यातील पहिले अपंग भवन परळीत

परळी (प्रतिनिधी) माठवाड्यातील पहिले अपंग व पेंशन भवन परळी येथे उभारण्यात येत आहे. या इमारतीचा भूमीपूजन सोहळा आज महाशिवरात्रीचे निमित्त साधून पार पडत आहे. यानिमित्ताने नरपालिकेच्या वतीने सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंंडे यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. शिवाय यावेळी अपंगांचा ३ टक्के निधीही वाटप करण्यात आला आहे. नगरपरिषदेने हा उपक्रम हाती घेतला असून याकरिता २२ लाख रुपये खर्ची पडणार आहेत.

महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

परळी वैद्यनाथ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक सोमवारीच परळीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दर्शनासाठी देवस्थानकडून प्रतिवर्षीप्रमाणेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कठिबद्ध-तहसिलदार शरद झाडके

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- राज्यशासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व जनतेला मिळावा, सर्व सामान्यांची कामे तात्काळ करुन देण्याचा सुचना तहसिल प्रशासनातील सर्व कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती परळीचे तहसिलदार शरद झाडके यांनी दिली.
आज शनिवार,दि.१० फेबु्रवारी रोजी परळीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार शरद झाडके यांचा तहसिल कार्यालयात

बनावट कागदपत्रा आधारे कर्ज घेतलेल्या कर्जदारांवर कधी गुन्हे दाखल करणार ? - पवार

परळी प्रतीनिधी:- वैद्यनाथ बैंकेचे चेअरमन यांच्या शिफारशीवरुन कर्जदारांनी बनावट कागदपत्रा आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले आहे त्यामुळे बैंक डबघाईला येऊन गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होत आहे मा चेअरमन यांनी स्वतः च्या मर्जीतील व स्वतः च्या फायद्यासाठी कर्जदाराचे घनिष्ठ संबंध असल्याने कोणतेही तारण न घेता कर्ज दिले आहे परंतु लहान कर्जदार व शेतकरी यांना वसुलीच्या तगादयापोटी आत्महत्या करण्याची वेळ येत आहे त्यामुळे बैंकेने व पोलिस प्रशासनाने थकीत मोठ्या कर्जदारावर कार्यवाही करावी जेणेकरून गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होणार नाही व चेअरमन ची हुकूम शाही बंद होईल.

​ना. पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे​ ​पंधरा दिवसांत बैठक घेऊ - उर्जामंत्र्यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन​

परळी - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर वीज महानिर्मिती प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीने रात्री उशीरा आपले उपोषण व आत्मदहन मागे घेतले. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उपोषणकर्ते यांच्यात थेट संवाद घडवून आणल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.

​ना.पंकजाताई मुंडे यांच्या मागणीमुळे बीड जिल्हयाला मिळाला ८९ कोटीचा वाढीव निधी​ ​जिल्हयाचा वार्षिक विकास आराखडा झाला ४०४ कोटीचा​ ​

​औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय​

बीड :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत बीड जिल्हयाला ८९ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे, या वाढीव निधीमुळे येत्या वर्षांत जिल्हयाच्या विकासासाठी आता ४०४ कोटी ३६ लाख एवढा भरभरून निधी उपलब्ध होणार आहे.

जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीधरराव गित्ते यांचे निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा श्री जगमित्र नागा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीधरराव गित्ते पाटील यांचे आज रविवार दि.04 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा वृध्दापकाळाने
राहात्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षोचे होते.आज दुपारी त्यांच्यावर टाळ, मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौठळी येथील पुष्पकर नदीतुन वाळु उपसा  महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष 

परळी वैजनाथ । परळी तालुक्यातील कौठळी येथे असणार्‍या पुष्कर नदीतुन मोठ्या प्रमाणात वाळु उपसा होत असुन परळी महसुल कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखों रुपयाचे नुकसान होत असुन या प्रश्नी प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी गावकर्‍यांतुन होत आहे. 

नायब तहसीलदार महादेव सुरवसे यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप सेवाभावी वृत्तीने काम करून वेगळी ओळख निर्माण केली-डॉ. शालिनीताई कराड 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नायब तहसीलदार महादेव सुरवसे यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या प्रत्येक भागात सेवाभावी वृत्तीने काम केले त्यामुळे प्रशासकीय सेवेत असुनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची काम करण्याची पद्धत आदर्श घेण्यासारखी आहे असे प्रतिपादन महिला व बाल हक्क आयोगाच्या डॉ. शालिनीताई कराड यांनी केले.

Pages