नायब तहसीलदार महादेव सुरवसे यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप सेवाभावी वृत्तीने काम करून वेगळी ओळख निर्माण केली-डॉ. शालिनीताई कराड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नायब तहसीलदार महादेव सुरवसे यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या प्रत्येक भागात सेवाभावी वृत्तीने काम केले त्यामुळे प्रशासकीय सेवेत असुनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची काम करण्याची पद्धत आदर्श घेण्यासारखी आहे असे प्रतिपादन महिला व बाल हक्क आयोगाच्या डॉ. शालिनीताई कराड यांनी केले.
परळी येथील तहसिलचे नायब तहसिलदार महादेव ज्ञानोबा सुरवसे हे दि. 31 जानेवारी 2018 रोजी नायब तहसिलदार महसूल विभागात सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा परळी सायक्लिगं कल्बतर्फे त्यांचा माणुसकीची नाती ऋण निर्दश सोहळा व निरोप समारंभाचे दर्शन मंडप,वैद्यनाथ मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. सर्व पदाधिकारी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल हक्क आयोगाच्या डॉ. शालिनीताई कराड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख, प्रा.डॉ. मधुकर आघाव, डॉ. सुर्यकांत मुंडे, विठ्ठलराव चौधरी, निवृत्त नायब तहसीलदार प्रमोद परळीकर, शिवसंग्रामचे तुळशिराम पवार, ज्येष्ठ नेते धम्मानंद मुंडे, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, आनंद हॉस्पिटलचे डॉ. राजाराम मुंडे, त्वचारोग तज्ञ डॉ.अजय मुंडे, पापा मुंडे, डॉ. बालासाहेब कराड, डॉ.अजित केंद्रे, डॉ.ज्ञानेश्वर घुगे, डॉ.संदिप घुगे, डॉ.अनिल घुगे, वसंत कराड, माजी सरपंच पांडुरंग इंगळे, प्राचार्य किशन पवार, डॉ.शेळके साहेब, उपजिल्हाधिकारी सामान्य व जिल्हा पुरवठा अधिकारी बीड, लेखाधिकारी फड साहेब, पत्रकार संजय खाकरे, रामप्रसाद शर्मा, वैद्यनाथ महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.आर.के.ईप्पर, से.नि.मंडळ अधिकारी पी.के.बडे, ए.तु.कराड सर, यांच्यासह परळी तहसिलचे सर्व कर्मचारी व सायकलिंग कल्बचे सर्व पदाधिकारी, मिरवटचे ग्रामस्थ व सोमेश्वर नगर येथील नागरिक तसेच सामाजिक, राजकिय, विधी, वैद्यकिय, पञकारीता, साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, उद्योग, शेती, प्रशासकिय , क्रीडा, सहकार, संगीत, कृषी क्षेञातील मान्यवरांची, महिला- भगिनी, ज्येष्ठ नागरीक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सर्व उपस्थितांचे स्वागत डॉ.रवींद्र सुरवसे यांनी केले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, प्रशासकीय सेवेत गेली अनेक वर्षे अविरत सेवा पणे महसूल विभाग 27 वर्ष पैकी 2 वर्षे बीड अडीच वर्षे सोनपेठ पैकी 6 महिने तहसीलदार 3 वर्षे अंबाजोगाई व परळी वैजनाथ 5 वर्षे तसेच त्यांनी शालेय विद्यार्थी तसेच त्यांनी स्वताच्या मुलांना डॉक्टर बनविले तसेच अनेक विद्यार्थी आज अधिकारी म्हणून सुरवसे यांच्या मार्गदर्शनामुळे घडवलेत व माध्यमिक शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून हे काम केले आहे.त्यांनी विविध पदावर अजातशत्रू तथा जनसेवकाचे काम केले आहे. म्हणून अशा आज व्यक्तीचा माणुसकीची नाती ऋण निर्दश सोहळा व स्नेह प्रेमाने मान्यवर भरूऊन गेले. म्हणून हा सोहळा त्यांच्या सेवाकाळात इमाने इतबारे केलेली सेवा ही कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुर्यकांत मुंडे यांनी केले. सुत्रसंचालन शिंदे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परळी सायक्लिगं कल्बचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार महादेव सुरवसे यांनी मानले.
Add new comment