मराठवाड्यातील पहिले अपंग भवन परळीत
परळी (प्रतिनिधी) माठवाड्यातील पहिले अपंग व पेंशन भवन परळी येथे उभारण्यात येत आहे. या इमारतीचा भूमीपूजन सोहळा आज महाशिवरात्रीचे निमित्त साधून पार पडत आहे. यानिमित्ताने नरपालिकेच्या वतीने सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंंडे यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. शिवाय यावेळी अपंगांचा ३ टक्के निधीही वाटप करण्यात आला आहे. नगरपरिषदेने हा उपक्रम हाती घेतला असून याकरिता २२ लाख रुपये खर्ची पडणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई सोमनाथअप्पा हालगे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, न. प. गटनेते वाल्मीक आण्णा कराड, मुख्याधिकारी डॉ. बि.डी. बिक्कड, स्थायी समिती सदस्य बाजीराव धर्माधिकारी, शकील कुरेशी, बांधकाम सभापती शेख रियानबी शरीफ, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे, पाणी पुरवठा सभापती, प्राजक्ता श्रीकृष्ण कराड, स्वच्छता व आरोग्य सभापती विजय भोयटे, महिला व बालकल्याण सभापती मिना गायकवाड, उपसभापती कमल कुकर आदि.
Add new comment