ना.पंकजाताई मुंडे यांच्या मागणीमुळे बीड जिल्हयाला मिळाला ८९ कोटीचा वाढीव निधी जिल्हयाचा वार्षिक विकास आराखडा झाला ४०४ कोटीचा
औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय
बीड :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत बीड जिल्हयाला ८९ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे, या वाढीव निधीमुळे येत्या वर्षांत जिल्हयाच्या विकासासाठी आता ४०४ कोटी ३६ लाख एवढा भरभरून निधी उपलब्ध होणार आहे.
जिल्हा नियोजन विकास समितीची विभाग स्तरावरील बैठक राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. मागील महिन्यात पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीड जिल्हयाचा ३१५ कोटी ३६ लाख रूपयांचा वार्षिक आराखडा मंजूर झाला होता. यात सर्वसाधारण योजनेसाठी २२३ कोटी ७० लाख, अनुसूचित जाती उप योजनेसाठी ८९ कोटी ६० लाख व आदिवासी उप योजनेसाठी २ कोटी ६० लाख इतकी तरतूद करण्यात आली होती.
बीडच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयाला वाढीव निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज झालेल्या विभागीय बैठकीत अर्थमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य करत ८९ कोटीचा वाढीव निधी मंजूर केला. हा निधी मंजूर झाल्याने येत्या वर्षाचा म्हणजे सन २०१८ - १९ सालचा वार्षिक आराखडा ४०४ कोटी ३६ लाख रूपये एवढा झाला आहे. गतवर्षीच्या विकास आराखड्याचे कपात झालेले ४३ कोटी रुपये सरकारने जिल्हयाला नुकतेच परत केले आहेत, हे विशेष! पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मागणीमुळे बीड जिल्हयाला भरभरून निधी मंजूर झाल्याने विकास कामांना आणखी गती मिळणार आहे.
Add new comment