कौठळी येथील पुष्पकर नदीतुन वाळु उपसा महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष
परळी वैजनाथ । परळी तालुक्यातील कौठळी येथे असणार्या पुष्कर नदीतुन मोठ्या प्रमाणात वाळु उपसा होत असुन परळी महसुल कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखों रुपयाचे नुकसान होत असुन या प्रश्नी प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी गावकर्यांतुन होत आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, कौठळी लगत वाहणार्या पुष्कर नदीतुन मोठ्या प्रमाणात वाळु उपसली जात आहेे. घराचे बांधकाम करावयाचे आहे. या कारणावरुन कांही जण तर अनेक जण पैसा कमावण्याच्या हेतुने वाळु चोरीचे काम करीत आहेत. जीसीबी, ट्रॅक्टर, हायवा टिपर यांचा वापर करुन प्रचंड वाळु उपसा होतांना दिसत आहे. दरम्यान या वाळुची कोणत्याही प्रकारची रॉयलटी ग्रामपंचायत अथवा परळी तहसिल कार्यालयाकडे भरली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबीकडे जाणुन बुजुन महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. होणारी उपसा रोखावी तसेच चोरटी वाहतुक करणार्या वाहनांवर कार्यवाही करावी अशी मागणी ही परिसरातुन जोर धरत आहे.
Add new comment